घरक्राइमSalman Khan House Firing : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात दोन संशयित...

Salman Khan House Firing : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नवी मुंबईच्या परिसरातून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर रविवारी (ता. 14 एप्रिल) पहाटे 5 वाजता दोन अज्ञात हल्लेखोरांनी हवेत अनेक राऊंड गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नवी मुंबईच्या परिसरातून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन संशयित ताब्यात घेतले आहेत. एका हिंदी वृत्त संस्थेने याबाबतची माहिती दिली असून या दोन्ही संशयितांची गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून कसून चौकशी केली जाणार आहे. (Salman Khan house firing case Two suspects in police custody)

दबंग खान सलमान याच्या घरावर रविवारी पहाटे गोळीबाराची घटना घडल्यानंतर याची महाराष्ट्र सरकारकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. या घटनेनंतर सलमानच्या सुरक्षेत आणि त्याच्या घराखालील सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. पण आज नवी मुंबईतून ज्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. या दोघांना ताब्यात घेण्याआधी पोलिसांकडून या घटनेत वापरलेल्या दुचाकीचा शोध घेतला, ज्यानंतर या घटनेत हल्लेखोरांनी वापरलेली दुचाकी पनवेलमधील एका व्यक्तीच्या नावावर असल्याची माहिती समोर आली.

- Advertisement -

हेही वाचा… Salman Khan: मोठी अपडेट समोर; सलमान खानच्या घरात घुसली गोळी

तर, गुन्हे शाखेने तपास करत या दुचाकीच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ही दुचाकी आपण काही दिवसांपूर्वी विकल्याचे या मालकाकडून सांगण्यात आले होते. हल्लेखोरांनी ही दुचाकी सलमान खानच्या घरापासून थोड्या अंतराजवळ असलेल्या चर्चजवळ सोडून दिली होती, नंतर ते ऑटोने वांद्रे स्थानकावर पोहोचले व तिथून ते लोकलने गेले होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. पण, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून या घटनेतील दोन हल्लेखोरांची ओळख पटवली आहे, आता ताब्यात घेतले ते दोघेही सीसीटीव्हीत दिसून येत असलेले हल्लेखोर आहेत की नाही, याबाबत कोणतीही माहिती स्पष्ट होऊ शकलेली नाही.

- Advertisement -

लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने स्वीकारली घटनेची जबाबदारी…

सलमान खान याच्या घरावरील हल्ल्याची जबाबदारी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याच्या भावाने घेतली आहे. हा तर फक्त डेमो होता, असे म्हणत अनमोल बिश्नोई याने सलमानला धमकी दिली आहे. तर, या घटनेच्या काही तासानंतर अनमोल याने हा हल्ला आपणच केल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली. त्यानंतर पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे. हा हल्ला केवळ ट्रेलर होता, असे अनमोल बिश्नोई याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : तामिळनाडूत राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून झडती; वाचा नेमकं प्रकरण काय?


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -