Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Samruddhi Highway : महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच, तीन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू

Samruddhi Highway : महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच, तीन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू

Subscribe

समृद्धी महामार्गामुळे लोकांच्या प्रवासातील वेळेत मोठी बचत झाली आहे. पण या महामार्गावर झालेल्या अपघातांमुळे मोठे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या महार्गावरील अपघातांची मालिका ही सुरूच आहे. शनिवारी (ता. 03 मे) समृद्धी महामार्गावर बुलढाणा हद्दीत झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती समोर आली आहे.

समृद्धी महामार्गामुळे लोकांच्या प्रवासातील वेळेत मोठी बचत झाली आहे. पण या महामार्गावर झालेल्या अपघातांमुळे मोठे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. तर या महामार्गावरून प्रवास करताना वेगाची मर्यादा आखून देण्यात आलेली आहे. पण असे असले तरी या मार्गावरील अपघातांची मालिका ही सुरूच आहे. शनिवारी (ता. 03 मे) समृद्धी महामार्गावर बुलढाणा हद्दीत झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – नाना पोटोले भावी मुख्यमंत्री? अजितदादा स्पष्टच बोलले

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर पहिला अपघात हा चेनेज क्रमांक 283 जवळ घडला. या घटनेत एका कारमधले तीन प्रवासी लघुशंकेसाठी थांबले असतांना त्यांच्या गाडीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
याच महामार्गावरील दुसऱ्या अपघातात ट्रकचालकाला डुलकी लागल्यामुळे ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर हा ट्रक थेट महामार्गाखाली गेला. या अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. मृतक चालक हा आझमगड येथे राहणारा असून दिनेशकुमार तिवारी असे चालकाचे नाव आहे. तर नागपूर कॉरिडॉरवर मेहकर जवळ चेनेज 280 जवळ झालेल्या तिसऱ्या अपघातात धुळ्याहून नागपूरकडे जाणारी कार भरधाव वेगात असताना उलटली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, चेनेज क्रमांक 283 जवळ जो अपघात घडला. त्यातील तिनही मृतक हे मित्र होते. लघुशंकेसाठी महामार्गावर थांबणे त्यांच्या जीवावर बेतल्याचे सांगण्यात येत आहे. पाच दिवसांपूर्वीच या महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला होता. 29 मेला मेहकरकडून एमएच 02-सीआर-1459 क्रमांकाची कार ही मुंबई कॅरिडॉरच्या दिशेने जात होती. परंतु दुसरबीड गावानजीक आल्यानंतर समृद्धी महामार्गावरील मिडीयममधील सिमेंटच्या रस्ता दुभाजकावर धडकली. त्यानंतर कारने अचानक पेट घेतला आणि त्यात दोघांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

नुकतेच हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर ता. इगतपुरी या 80 किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या महामार्गामुळे नाशिक ते शिर्डी हे अंतर जलदरित्या कापता येणे शक्य होणार आहे, असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -