Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश पाढा पाठ नाही, म्हणून शिक्षिकेने विद्यार्थ्याला वर्गमित्रांकडूनच दिला चोप; राहुल गांधी म्हणतात,...

पाढा पाठ नाही, म्हणून शिक्षिकेने विद्यार्थ्याला वर्गमित्रांकडूनच दिला चोप; राहुल गांधी म्हणतात, ही भाजपची देण

Subscribe

मुझफ्फरनगरच्या मन्सूरपूर भागातील एका गावात एका खाजगी शाळेतील शिक्षक एका विद्यार्थ्याला वर्गातील इतर मुलांना मारहाण करण्यास सांगत आहेत. मारहाण करण्यात आलेला विद्यार्थी हा मुस्लिम असल्याचे सांगण्यात येत आहे. महिला शिक्षिकाही एका विशिष्ट धर्माबद्दल काही कमेंट करताना दिसतात.

मुझफ्फरनगर: यूपीच्या मुझफ्फरनगरमधून एक लाजिरवाणा आणि धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक शिक्षिकेने बाकीच्या वर्गातील मुलांकडून एका विद्यार्थ्याला मारहाण करायला लावत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला जातीय वळणही दिले जात आहे. या प्रकरणाची दखल घेत एसएसपींनी चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी बीएसएकडून शनिवारपर्यंत अहवाल मागवला आहे. दुसरीकडे, पीडितेच्या वडिलांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यास नकार देत मुलाचं नाव शाळेतून वगळण्यात यावं, असं सांगितलं आहे. (Uttar Pradesh Muzaffarnagar news teacher got the student beaten up by his school friend rahul gandhi got angry )

व्हायरल व्हिडिओनुसार, मुझफ्फरनगरच्या मन्सूरपूर भागातील एका गावात नेहा पब्लिक स्‍कूल या खासगी शाळेतील शिक्षिकेने एका विद्यार्थ्याला वर्गातील इतर मुलांना मारहाण करण्यास सांगत आहेत. मारहाण करण्यात आलेला विद्यार्थी हा मुस्लिम असल्याचे सांगण्यात येत आहे. महिला शिक्षिकाही एका विशिष्ट धर्माबद्दल काही कमेंट करताना दिसतात.

- Advertisement -

व्हायरल व्हिडिओमध्ये, शिक्षिकेने प्रथम एका मुलाला सांगितले… की याच्या कानशिलात लगाव. त्यानंतर तिने दुसऱ्या मुलाला बोलावले आणि तिला जोरात मारण्यास सांगितले. यादरम्यान शिक्षक कोणाशी तरी बोलत असताना आक्षेपार्ह शेरेबाजीदेखील करत असल्याचं दिसून येत आहे.

एका यूजरने मुझफ्फरनगर पोलिसांना हा व्हिडीओ ट्विटरवर टॅग केला आणि कारवाईची मागणी केली आहे. यानंतर, हा व्हिडीओवर अनेकांनी रिट्विट्स आणि कमेंट्स केले. काही तासांतच हॅशटॅगही ट्रेंडिंग सुरू झाले आणि काही वेळातच हा व्हिडिओ देशातील टॉप ट्रेंडिंग यादीत सामील झाला.

- Advertisement -

राहुल गांधी म्हणाले, हे भाजपचं देण

राहुल म्हणाले, भाजपचं हे देणं आहे. भाजपने भारताच्या कानाकोपऱ्यात धर्म द्वेषाची आग लावली आहे. प्रियांका गांधी म्हणाल्या, द्वेष हा प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आहे. या द्वेषाच्या विरोधात आपण संघटित होऊन बोलले पाहिजे.

डीएमने बीएसएकडून अहवाल मागवला

हा व्हिडिओ व्हायरल होताच जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हा दंडाधिकारी अरविंद मल्लापा बांगारी यांनी या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून शनिवारपर्यंत मागवला आहे. बीएसए शुभम शुक्ला यांनी शहापूर ब्लॉकच्या ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरला गावात चौकशीसाठी पाठवले आहे. एसपी संजीव सुमन यांनी पोलीस ठाणे आणि अधिकारक्षेत्र अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले की, आम्हाला कोणत्याही वादात पडायचे नाही. शाळा व्यवस्थापनाशी बोललो, ते आमची फी परत करत आहेत, मी मुलाचे नाव शाळेतून कमी करुन ते दुसऱ्या शाळेत घालणार आहे. दरम्यान, या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून योग्य कारवाई केली जाणार आहे.

( हेही वाचा: Anand Dighe Anniversary: आज आनंद दिघे असते तर त्यांनी शिवसेना सोडली असती का? )

- Advertisment -