घरमहाराष्ट्रNCP Split : हसन मुश्रीफ आणि जितेंद्र आव्हाडांमधील वाद उफाळला, वाचा काय...

NCP Split : हसन मुश्रीफ आणि जितेंद्र आव्हाडांमधील वाद उफाळला, वाचा काय आहे प्रकरण?

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटातील आमदार आणि सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामधील शाब्दिक वाद वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापुरातील सभेमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली. त्यांच्या या टीकेला हसन मुश्रीफ यांच्याकडून सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल (ता. 25 ऑगस्ट) कोल्हापुरातील दसरा मैदानात जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी कोणाचेही नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पाडल्यानंतर राष्ट्रवादीला भलेमोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे आता 82 व्या वर्षी शरद पवार यांनी पक्षाला नव्याने उभारणी देण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी आता शरद पवार पक्षाची मोर्चेबांधणी करण्यासाठी जाहीर सभा घेत आहेत. नाशिक जिल्ह्यातील येवल्यातून शरद पवारांनी आपल्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून त्यांच्या नेतृत्वातील तिसरी सभा ही काल कोल्हापुरात पार पडली. कोल्हापूर हा हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या कालच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

हेही वाचा – Sharad Pawar : आमदार म्हणजे पक्ष नव्हे, शरद पवारांचा अजित पवार गटाला टोला

- Advertisement -

शरद पवार हे कोल्हापुरातील सभेमधून हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण पक्षातून गेलेल्यांचे नाव घेऊन त्यांना मोठे का करायचे? पहिल्यापासून ही भूमिका घेतलेले शरद पवार यांनी नेहमीप्रमाणे कालच्या सभेतही कोणाचेच नाव घेतले नाही. परंतु, त्यांनी नाव न घेता केलेली टीका देखील अजित पवार गटातील आमदारांना लागल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटातील आमदार आणि सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामधील शाब्दिक वाद वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. कालच्या कोल्हापुरातील सभेमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली. त्यांच्या या टीकेला हसन मुश्रीफ यांच्याकडून सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. (NCP Split: Hasan Mushrif and Jitendra Awhad’s Controversy Rises)

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

18 वर्षे मंत्री असतानाही हसन मुश्रीफांनी काय केले. 18 वर्षे मंत्री असूनसुद्धा आम्ही विकासासाठी चाललो आहोत, असे म्हणायला काही वाटत नाही. कामगार मंत्री, ग्रामीण विकास मंत्रीपद दिल्यानंतरही रडगाणे सुरू आहे, असा टोला त्यांनी लगावला होता. ज्यानंतर आता संतापलेल्या मुश्रीफांनी आव्हाडांसाठी थेट चपलेच्या शब्दाचा वापर केला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले हसन मुश्रीफ?

महाराष्ट्रात आता गद्दारी दिसू लागली आहे. हे साप बिळात होते. बिळातले साप आता बाहेर पडू लागले आहेत. या सापांना ठेचण्यासाठी आपल्याला पायतानाचा वापर करावा लागेल. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे या कोल्हापुरात सर्वात प्रसिद्ध काय आहे? पायतान! या पायतानाचा उपयोग अख्या महाराष्ट्राने करावा अशी माझी इच्छा आहे, असे जहरी प्रत्युत्तर मुश्रीफांनी आव्हाडांना दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -