आजकल सर्वांमध्ये ओरल हेल्थची समस्या होते. कमी वयातच दात, हिरड्या आणि तोंडासंबंधित अन्य समस्या उद्भवू लागतात. डेंटल प्रॉब्लेम्स वाढणे योग्य नाही. परंतु आजकाल खाण्यापिण्याची सवय, स्मोकिंग आणि तंबाखूच्या सेवनाने ओरल हेल्थ बिघडले जाते. तर डेंटल केअर प्रोडक्ट्ससाठी वापरले जाणारे टुथपेस्टमध्ये काही आर्टिफिशियल फ्लेवर्स आणि केमिकल्स असतात. जे ओरल हेल्थला प्रभावित करू शकतात.
पण आयुर्वेदातील काही हर्ब्सच्या माध्यमातून तुम्ही दातांची काळजी घेऊ शकता. काही खास हर्ब्सने ओरल हाइजीन मेंटेन करता येऊ शकते.
-कडुलिंब
कडुलिंब आयुर्वेद आणि होम्योपथी चिकित्सामधील सर्वाधिक महत्त्वाची जडी बुटी आहे. कडुलिंबात नैसर्गिक रुपात अँन्टी बॅक्टेरियल, एस्ट्रिंजेंट आणि एंटीसेप्टिक गुणांसाठी ओळखले जातात. तुम्ही जरुर पाहिले असेल किंवा ऐकले असेल की, कडुलिंबाच्या काडीने दात स्वच्छ केल्याने ओरल हेल्थ राखले जाते.
–लवंग
लवंग हे एक नैसर्गिक रुपात एंटीसेप्टिक असून त्यात युजेनॉल कंपाउंड असते. जे दुखणे आणि सूजेची समस्या कमी करते. जर तुम्हाला अपचनाची समस्या असेल तर लवंगाच्या तेलाचे वापर करू शकता. लवंगात नैसर्गिक रुपात अँन्टी बॅक्टेरियल आणि अँन्टीव्हायरल गुण असतात. जे तुमच्या तोंडातून निघणारे हानिकारक बॅक्टेरिया दूर करतात.
-तुळशीची पाने
तुळशीच्या पानात अँन्टीबॅक्टेरियल गुण असतात. याच्या एस्ट्रिंजेंट प्रॉपर्टी बॅक्टेरियाशी लढणे आणि संक्रमणापासून दूर करण्यास मदत करतात. तोंडातील प्लांक आणि कॅविटी निर्माण करणारे हानिकारक बॅक्टेरियासुद्धा यामुळे दूर होतात. तुळशीचा वापर जखमेवर उपचार, तोंडातील दुर्गंधी आणि मौखिक संक्रमणच्या उपचारासाठी केला जातो.
-लसूण
लसूण केवळ पदार्थांची चव वाढवतेच पण तुम्ही आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. लसणात अँन्ट इंफ्लेमेटरी प्रॉपर्टी इम्युन सिस्टिमला मजबूत करण्यास मदत करते. त्याचसोबत हिरड्यांची सूज कमी होते.
-पुदीना
पुदीन्यात काही महत्त्वपूर्ण प्रॉपर्टीज अँन्टी बॅक्टेरियल, अँन्टी इंफ्लेमेटरी आणि अँन्टी फंगल जे ओरल हेल्थसाठी फायदेशीर ठरतात. त्याचसोबत याचा सुगंध अत्यंत कमालीचा असतो. त्यामुळे तोंडाला येणारी दुर्गंधी दूर होते. पुदीन्याची पाने चावल्याने लाळ तयार होते आणि दात सफेद होतात. त्याचसोबत तुम्ही याच्या चहाचे सेवन करू शकता.
-हळद
हळदीचा वापर औषधीय गुणांसाठी केला जातो. यामध्ये अँन्टी इंफ्लेमेटरी गुण असतात, जे आरोग्य हेल्थसाठी फायदेशीर ठरते. हळदीची पेस्ट हिरड्यांना लावल्याने आराम मिळतो. सूज कमी होते.
हेही वाचा- दातातील किड घरगुती उपायांनी करा दूर