Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthअशाप्रकारे करा तुमच्या टूथब्रशची देखभाल

अशाप्रकारे करा तुमच्या टूथब्रशची देखभाल

Subscribe

संपूर्ण शरीरासोबतच आपल्या दातांचे आरोग्य देखील उत्तम असणं आवश्यक आहे. दात निरोगी ठेवण्यासाठी टूथब्रशची मोठी भुमिका असते. टूथब्रशमुळे आपले दात स्वच्छ होतात तसेच दातांवर जमा झालेले घटक निघून जातात. त्यासाठी योग्य टूथब्रशचा वापर करणं आणि तो स्वच्छ करणं देखील आवश्यक आहे. कारण जेव्हा तुम्ही दात स्वच्छ करता तेव्हा तोंडातील व्हायरस आणि बॅक्टेरिया टूथब्रशवर लागतात. जर टूथब्रश योग्य प्रकारे स्वच्छ केला नाही तर हेच बॅक्टेरिया पुन्हा तोंडात जाऊन आपल्या दातांना आणि हिरड्यांना हानी पोहचवतात. यामुळे दातांसंबंधीत समस्या उद्भवू शकतात. आज आम्ही तुम्हाला टूथब्रशला स्वच्छ ठेवण्यासाठी काही सोप्या पध्दती सांगत आहोत.

अशी घ्या तुमच्या टूथब्रशची काळजी

Tips for Keeping Your Toothbrush Clean

- Advertisement -
  • टूथब्रश कधीच एखाद्या कंटेनरमध्ये ठेवू नका. यामुळे त्याच्यात ओलावा राहतो, ज्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया निर्माण होतात.
  • टूथब्रश नेहमी सरळ उभा करुन ठेवावा. असे केल्याने ब्रशवर जमा झालेले पाणी हळुहळू खाली जाते आणि टूथब्रश वाळण्यास मदत होते. असे केल्यामुळे ओलावा निर्माण करणारे बॅक्टेरिया तयार होत नाहीत.
  • टूथब्रश शौचालयापासून कमीत कमी 2 फूट अंतरावर ठेवा. कारण फ्लश करताना पाण्यातील सर्व बॅक्टेरिया हवेद्वारे पूर्ण बाथरुममध्ये पसरतात, जे तुमच्या टूथब्रशवर देखील जमा होतात.

How To Take Care Of Your Toothbrush

  • टूथब्रशच्या होल्डरला आठवड्यातून एकदा तरी अवश्य स्वच्छ करा. असे केल्याने होल्डरमध्ये जमलेले बॅक्टेरिया तुमच्या ब्रशमध्ये जाणार नाही. ब्रश होल्डरचा खालचा भाग अवश्य स्वच्छ करा.
  • घरातील सदस्यांचे टूथब्रश एकमेकांच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी घ्या. असे केल्याने एका ब्रशचे बॅक्टेरिया सहज दुसर्‍या ब्रशमध्ये जातील.
  • ब्रश केल्यानंतर टूथब्रश चांगल्या प्रकारे हलवून कोरडा करून घ्या. कारण टूथब्रश जेवढा जास्त ओला असेल तेवढे जास्त बॅक्टेरिया निर्माण होण्याची भीती असते.
  • आपल्या टूथब्रशला प्रत्येक 3-4 महिन्यानंतर बदलत राहा. जर ब्रिसल जास्त लवकर खराब होत असलीत तर लवकर बदला. लहान मुलांचे टूथब्रश लवकर चेंज करत राहा.

हेही वाचा : आठवड्यातून एक दिवस उपवास केल्याने राहाल हेल्दी

- Advertisment -

Manini