Tuesday, April 30, 2024
घरमानिनीKitchenब्रेकअपनंतर साउथ कोरियातील लोक खातात Black Noodles

ब्रेकअपनंतर साउथ कोरियातील लोक खातात Black Noodles

Subscribe

साउथ कोरियातील लोक 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाइन डे च्या दिवशी एकमेकांना आपल्या मनातील भावना व्यक्त करतात. काही लोकांना त्यांचा पार्टनर भेटतो तर काहींचे मन मोडले जाते. व्हेलेटाइन डे च्या नंतर व्हाइट डे साजरा केला जातो. या दिवसी सर्व पार्टनर आपल्या पार्टनरला चॉकलेट किंवा मिठाई देतात. याच्या एका महिन्यानंतर म्हणजेच 14 मार्चला सिंगल लोक ब्लॅक डे साजरा करतात. या दिवशी सर्व सिंगल एकत्रित मिळून ब्लॅक नूडल्स बनवून खातात. ब्लॅक नूडल्सच्या या डिशला साउथ कोरियात Jajangmyeon असे म्हटले जाते. ही डिश ब्लॅक बीन सॉस पासून तयार केली जाते.

- Advertisement -

साहित्य-
अर्धा हिरवा कोबी
2 पिवळे कांदे
4 हिरवे कांदे
पाउण कप तेल
हाडं नसलेले पोर्क
एक इंच आल्याचा तुकडा
पाउण कप कोरियाई ब्लॅक बीन पेस्ट
दीड चमचा साखर
एक मोठा चमचा सोया सॉस
पाउण चमचा चिकन बुउलॉन पावडर
तीन ते चार कप पाणी
दोन मोठे चमचे बटाट्याचे स्टार्च किंवा कॉर्नस्टार्च
एक काकडी
एक चमचा अॅप्पल विनेगर
नूडल्स

- Advertisement -

कृती-
सर्वात प्रथम सर्व भाज्या बारीक कापून त्या एका बाउलमध्ये काढा. त्यानंतर गॅसवर कढई ठेवा आणि यामध्ये तेल टाकून गरम करा. या तेलात भाज्या टाकून हलक्या फ्राय करा. भाज्या हलक्या फ्राय केल्यानंतर पोर्क आणि बारीक केलेले आले टाकून व्यवस्थितीत भाजा. जो पर्यंत पोर्क लाल होत नसेल तो पर्यंत ते शिजवा. त्यानंतर साखर, ऑयस्टर सॉस, सोया सॉस, चिकन बुउलॉन पावडर टाकून दोन ते तीन मिनिटे शिजवा. एक ते दोन मिनिटे शिजवा आणि थोडं पाणी टाका. पाणी टाकल्यानंतर यामध्ये कॉर्न स्टार्च मिक्स करा. त्यानंतर विनेगर टाकून थोडावेळ शिजवा.


हेही वाचा- चहा पावडरपासून बनवा डेझर्ट आणि बरच काही…

- Advertisment -

Manini