घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरऐकावं ते नवलच; टोमॅटो चोरीला जाऊ नये म्हणून 'त्यांनी' चक्क शेतातच लावले...

ऐकावं ते नवलच; टोमॅटो चोरीला जाऊ नये म्हणून ‘त्यांनी’ चक्क शेतातच लावले CCTV कॅमेरे

Subscribe

आजही ग्रामीण भागात शेतमाल, शेतीसाहित्य चोरीला जाण्याच्या घटना घडत असतात. मात्र, आता या शेतमातील फक्त टोमॅटोच्या चोरीच्या घटना घडत असतील तर?.

मुंबई : शेतमालाची चोरी होणे हे काही नवीन नाही. आजही ग्रामीण भागात शेतमाल, शेतीसाहित्य चोरीला जाण्याच्या घटना घडत असतात. मात्र, आता या शेतमातील फक्त टोमॅटोच्या चोरीच्या घटना घडत असतील तर?. नवल वाटणारच ना. परंतू टोमॅटोच्या वाढत्या दरामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात टोमॅटो चोरीला गेल्याचे वृत्त पुढे आले होते. मात्र, यापासून बचावासाठी छत्रपती संभाजी नगरमधील एका शेतकऱ्यांने चक्क टोमॅटोवर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या शेतात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवले आहेत.

आधी गेले होते टोमॅटो चोरीला

छत्रपती संभाजीनगरपासून किमान 20 किलो मीटर अंतरावर असलेल्या शहापूर (Shahapur) येथील शरद रावते (Sharad Rawate) यांनी सुमारे दीड एकर शेतात टोमॅटोचे पीक घेतले आहे. काही दिवसांपूर्वी रावते यांच्या शेतातून 25-30 किलो टोमॅटो चोरीला (Theft) गेले होते. त्यानंतर रावते यांनी त्यांच्या शेतात सीसीटीव्ही कॅमेरा बसवले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Karnatak Hc : पतीच्या काळ्या रंगाला हिणवणेही ठरू शकते घटस्फोटाचे कारण; कर्नाटक उच्च न्यायालयाने नोंदविले निरीक्षण

6 ते 7 लाखाचा मिळू शकतो नफा

सध्या बाजारात टोमॅटो 100 ते 200 रुपये किलो दराने विकला जात आहे. अशा परिस्थितीत छत्रपती संभाजी नगरपासून 20 किमी अंतरावर असलेल्या शाहपूर येथील एका शेतकऱ्याने टोमॅटोवर लक्ष ठेवण्यासाठी आपल्या शेतात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. टोमॅटोचे नुकसान आता सहन होत नसल्याचे शरद रावते नावाच्या शेतकऱ्याचे म्हणणे आहे. रावते यांना टोमॅटोचे पीक विकून सुमारे सहा ते सात लाख रुपयांचा नफा मिळू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ‘मोदी जानते है जनता की नाडी, तभी मैंने बढाई दाढी’; आठवलेंच्या कवितेवर शहा हसले…

सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी आला 22 हजार रुपये खर्च

रावते यांनी सुमारे दीड एकर क्षेत्रात टोमॅटोचे पीक घेतले आहे, अशा परिस्थितीत रावते टोमॅटोचे पीक विकून सुमारे सहा ते सात लाख रुपये मिळवू शकतात. रावते यांनी आपल्या पिकाच्या सुरक्षिततेसाठी 22 हजार रुपये किमतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. बसवलेला सीसीटीव्ही कॅमेरा सौरऊर्जेवर चालतो, त्यामुळे विजेचा खर्च येणार नाही, असे शेतकरी सांगतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -