Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Health Periods मध्ये नक्की घ्या हे ज्यूस

Periods मध्ये नक्की घ्या हे ज्यूस

Subscribe

पीरियड्स मध्ये हैवी ब्लिडिंगच्या कारणास्तव काही महिला आणि तरुणींना प्रत्येक तासांनी पॅड बदलावे लागते. अशातच हेल्थ संबंधित समस्या जसे की, असंतुलित हार्मोन्स, मानसिक आरोग्य, थायरॉइडच्या कारणास्तव असते. या व्यतिरिक्त अधिक उपवास, गरजेपेक्षा अधिक एक्सरसाइज, मिर्ची मसाले आणि ऑइली फूड्स खाण्यासंबंधित समस्या असतात. परंतु तरीही काही वेळेस शरिरात विटामिन्स आणि मिनिरल्सच्या कारणास्तव हैवी ब्लिडिंग होऊ लागते. (Juices for periods)

हैवी ब्लिडिंगच्या कारणास्तव महिलांना थकवा जाणवतो आणि दुखते सुद्धा. यामुळेच आम्ही तुम्हाला आज अशा काही ज्यूस बद्दल सांगणार आहोत जे हैवी ब्लिडिंग रोखण्यास आणि पीरियड्स रेग्युलर करण्यास मदत करु शकतात. याचबद्दल आयुवर्दिक तज्ञ काय सांगतायत हे पाहूयात. जर तुम्हाला पीरियड्स दरम्यान हैवी ब्लिडिंग होत असेल तर तुम्ही सुद्धा ते आयुर्वेदित ज्यूस पिऊ शकता.

- Advertisement -

केळ्याचे फूल


केळ्याच्या फूलाचे सेवन केल्याने आरोग्यासंबंधित काही फायदे होतात. यामध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, फॉस्फोरस, कॉपक, लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे तत्व असतात. आयुर्वेदात केळ्याच्या फुलाला औषधाच्या रुपात वापर केला जातो. केळ्याचे फूल प्रोजेस्टेरोन युक्त असते. जे पीरियड्स दरम्यान अधिक ब्लिडिंगला कंट्रोल करते.

- Advertisement -

जास्वंदाचे फूल


महिलांसाठी जास्वंदाचे फूल वरदान आहे. यामध्ये विटामिन सी, लोह, फायबरसह अँन्टी-ऑक्सिडेंट असतात जे तुम्हाला काही समस्यांपासून दूर ठेवते. पीरियड्समध्ये समस्या दूर करण्यासाठी जास्वंदाचे फूल फायदेशीर ठरते. शरिरात एस्ट्रोजनचा स्तर कमी होतो आणि हार्मोन्स बिघडू लागतात. हे फूल शरिरात एस्ट्रोजनचा स्तर व्यवस्थितीत राहतो. (Juices for periods)

दुर्वा


दुर्वांचा वापर पूजेसाठी केला जातो. परंतु तुम्हाला माहितेय का, आयुर्वेदाच्या उपचारासाठी याचा वापर एक जडीबूटीच्या रुपात केला जातो. याच्या ज्यूसमुळे तुम्हाला आरोग्यासंबंधित खुप फायदे होतात. हा महिलांच्या आरोग्यासाठी फार उत्तम असतो. दुर्वा पीरियड्स रेग्युलर करणे, हैवी ब्लिडिंगला कंट्रोल करणे आणि पीसीओएस संबंधित लक्षणे ठिक होऊ शकतात.


हेही वाचा- Heavy Menstrual Bleeding वेळी ‘या’ गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष

- Advertisment -

Manini