घरमनोरंजनमाझ्या आयुष्यातील कठीण काळ सुरु आहे... काजोलने सोशल मीडियाला केलं गुडबाय

माझ्या आयुष्यातील कठीण काळ सुरु आहे… काजोलने सोशल मीडियाला केलं गुडबाय

Subscribe

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री काजोलचे आजही लाखो चाहते आहेत. काजोल नेहमीच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते. काजोल सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. इंस्टाग्रामवर काजोलचे 14 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. दरम्यान, अशातच काजोलच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. नुकतीच काजोलने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने सोशल मीडियाला गुडबाय म्हटलं आहे.

काजोलने केलं सोशल मीडियाला गुडबाय

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

काजोलने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने सांगितलं की, तिने सोशल मीडियावरुन ब्रेक घेत असल्याचे सांगितले. यात खाली कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय की, मी आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगाला सामोरं जात आहे.” या पोस्टव्यतिरिक्त काजोलने तिचे जुने सर्व फोटो देखील काढून टाकले आहेत.

- Advertisement -

चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

काजोलच्या या निर्णयाने चाहते दुःखी झाले आहेत. अनेकजण तिच्या या निर्णयावर चिंता व्यक्त करु लागले आहेत. एकाने लिहिलंय की, तुम्ही नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा नकारत्मकतेच्या काळातही तुम्हावर खूप प्रेम करणारे लोक आहेत.

- Advertisement -

काजोलच्या सोशल मीडिया पोस्टचा या वेबसीरिजशी संबंध

काजोल आता चित्रपटांव्यतिरिक्त ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. काजोल लवकरच डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणाऱ्या ‘द गुड वाइफ’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. ज्यात ती एक वकीलाची भूमिका साकारत आहे. यात ती तिच्या केसला आयुष्यात सर्वात कठीण प्रसंग असल्याचं म्हणते. कदाचित काजोलच्या या पोस्टचा संबंध या वेबसीरिजशी असल्याचे म्हटले जात आहे.


हेही वाचा : लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त विग्नेशने शेअर केला फॅमिली फोटो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -