Thursday, June 8, 2023
घर मानिनी Health प्री-टर्म बेबीसाठी Kangaroo Care नक्की काय आहे, जाणून घ्या

प्री-टर्म बेबीसाठी Kangaroo Care नक्की काय आहे, जाणून घ्या

Subscribe

काही वेळेस प्रीटर्म डिलिव्हरी किंवा प्री मेच्योर डिलिव्हरीमुळे मुलं 9 महिन्याआधीच जन्माला येते. अशी बाळं पुर्णपणे विकसित होत नाहीत. त्यांचे वजन सुद्धा फार कमी असते. यामुळे बाळ गंभीर आजारांचा सामना, संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. तसेच प्री मेच्योर बालांचा मृत्यू दर ही या कारणामुळे वाढतो. या सर्व जोखिमांपासून बचाव करण्यासाठी त्यांना इनक्युबेटरमध्ये ठेवले जाते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशनच्या प्रीटर्म डिलिव्हरीच्या कारणास्तव जन्मलेले इम्मेच्योर बेबींसाठी कंगारु केअरचा सल्ला दिला जातो. अशातच कंगारु केअर नक्की काय हे जाणून घेऊयात.

प्री मेच्योर बेबींची फार काळजी घ्यावी लागते. आईच्या सहवासात सातत्याने राहिल्यास ते विकसित होतात. हिच गोष्ट कंगारु केअर मध्ये सुद्धा केली जाते. यावेळी ही बाळाची आईशी स्किन टू स्किन संपर्क ठेवला जाण्याचा अभ्यास केला जातो.

- Advertisement -

फिजिशियन आणि संशोधक एडगर रे सनाब्रिया आणि हेक्टर मार्टिनेज-गोमेज यांनी 1979 मध्ये कोलंबियाच्या बोगोटा मध्ये कंगारु मदर प्रोग्राम विकसित केले. यामध्ये वजनाने कमी असलेल्या बाळांसाठी पारंपरिक इनक्युबेटर उपचारासाठी ऑप्शन म्हणून ठेवले होते. खरंचक कमी वजनाच्या बाळांना तत्काळ कंगारु मदत केरअरची सुविधा दिली जाते.

- Advertisement -

वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशनच्या मत यामध्ये बालासोबत स्किन टू स्किन संपर्क केला जातो. सर्वसामान्यपणे इमॅच्योर बेबीच्या जन्मानंतर आई पासून वेगळे केले जाते. मुलाला इनक्युबेटर मध्ये ठेवले जाते. कंगारु केअर मध्ये बाळाला आईसह पुढे बांधले जाते. या दरम्यान स्तनपान सुद्धा केले जाते. आईच्या शरिराच्या उबेमुळे वेळेआधीच जन्माला आलेले किंवा जन्मावेळी कमी वजन असलेल्या बाळ जीवंत राहण्याची शक्यता अधिक वाढली जाते.

डब्लूएचओच्या सिफारशीनुसार, शिशुला इनक्युबेटर मध्ये ठेवल्यानंतर कंगारु मदत केअर सुरु झाली पाहिजे. यासाठी 3-7 दिवस लागू शकतात. तर जन्मानंतर लगेच कंगारु मदत केअर केल्याने मृत्यू दरात ही 40 टक्क्यांनी कमतरता येऊ शकते.


हेही वाचा- मुलांना confident बनवायचय, मग आधी स्वतःला लावा ‘या’ सवयी

- Advertisment -

Manini