Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Ballia News: गंगा नदीत बोट उलटली; तिघांचा मृत्यू तर 20 ते 25...

Ballia News: गंगा नदीत बोट उलटली; तिघांचा मृत्यू तर 20 ते 25 जण बेपत्ता

Subscribe

उत्तर प्रदेशातील बलिया येथून गंगा नदीत 40 जणांना घेऊन जाणारी बोट पलटी झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात 20 ते 25 हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे.

उत्तर प्रदेशातील बलिया येथून गंगा नदीत 40 जणांना घेऊन जाणारी बोट पलटी झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात 20 ते 25 हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. ( Ballia News Boat capsizes in Ganga s River Three people died and 20 to 25 people went missing )

मिळालेल्या माहितीनुसार, बलिया जिल्ह्यातील मालदेपूर गंगा घाट येथे ही घटना घडली. कुटुंबातील सदस्य मुंडन संस्कारासाठी जात होते. कुटुंबातील सर्व लोक बोटीतून जात असताना अचानक बोट उलटली. लोकांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक मदतीसाठी धावले. जवळपास सहा लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे .

- Advertisement -

20 ते 25 लोक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे. त्यांचा शोध घेण्यात येत होता. स्थानिक प्रशासनही घटनास्थळी पोहोचले आहे.

( हेही वाचा: ₹ 2000 Note : दोन हजारांच्या नोटेसाठी मोदी अनुकूल नव्हते, माजी अधिकाऱ्याचा खुलासा )

- Advertisement -

- Advertisment -