BMC election : मोदींना तळ ठोकून बसायला सांगा; राऊतांचा खोचक टोला

मुंबई महापालिका, ठाणे महानगरपालिकांसह 14 महापालिकांच्या निवडणुका घेण्याची हिंमत तुम्ही का दाखवत नाही? मोदींना प्रचाराला येऊ देत, अमित शाह यांना प्रचार करु दे आणखी कोणालाही येऊ देत. इथे तंबू ठोकून बसलात तरी आमचं काहीही म्हणणं नाही. निवडणुका घ्या ही आमची मागणी आहे.

Sanjay raut
फडणवीस हा फार चांगला माणूस आहे. मला त्यांची दया येते. कीव येते

मुंबई महापालिका निवडणुंकावरुन सध्या राजकीय पक्ष आरोप प्रत्यारोप करत आहेत. भाजपने मिशन 150 आखलं आहे, त्यासाठी अनेक बैठकाही घेत आहे तर ठाकरे गटानेही कंबर कसली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला आव्हान देत मोदींवर टीकास्त्र डागलं आहे.( Sanjay Raut Criticized Narendra Modi And Amit Shah over BMC Election )

मुंबई महापालिका, ठाणे महानगरपालिकांसह 14 महापालिकांच्या निवडणुका घेण्याची हिंमत तुम्ही का दाखवत नाही? मोदींना प्रचाराला येऊ देत, अमित शाह यांना प्रचार करु दे आणखी कोणालाही येऊ देत. इथे तंबू ठोकून बसलात तरी आमचं काहीही म्हणणं नाही. निवडणुका घ्या ही आमची मागणी आहे. त्यानंतर दाखवू की जनमत कोणाच्या बाजूने आहे कोणाला किती जागा मिळतात? असं आव्हान राऊत यांनी दिलं आहे.

जागावाटपाबाबत तडजोड करावी लागणार

महाराष्ट्रात जागावाटप करत असताना तीन पक्षांमध्ये समन्वय साधावा लागेल. काहीवेळी तडजोड करावी लागेल हे सत्य आहे. शिवसेा आणि भाजप एकत्र असतानाही आम्ही तडजोडी केल्या आहेत. आताही करु, आम्ही ज्या तडजोडी केल्या त्याचाच फायदा भाजपने घेतला आहे. आम्ही यावेळई 19 चा आकडा कायम ठेवू असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

कर्नाटकचा पराभव लपवण्यासाठी नोटबंदी

दोन हजारांच्या नोटा वितरणातून मागे घेणं हा निर्णय म्हणजेच देशाला एक लहरी राजा मिळाला आहे. लहरी राजा असेच निर्णय घेणार हे गृहित धरुन आपण 2024 चा काळ ढकलणार आहोत, असं राऊत म्हणाले. कर्नाटकात झालेला दारुण पराभव लवण्यासाठीच ही नोटबंदी केल्याचं राऊत म्हणाले.

जयंत पाटलांनी खंबीरपणे सामोर जावं

जयंत पाटलांची ईडी चौकशी हे राजकीय षड्यंत्र आहे. जयंत पाटील याला झुकणार नाहीत. ते मजबूत मनाचे स्वाभीमानी नेते आहेत. आम्हालाही अशाच षड्यंत्रांत अडकवून गुडघे टेकायला भाग पाडण्याचा प्रयत्न झाला. पण आम्ही झुकलो नाही, असं म्हणत राऊतांनी जयंत पाटील यांना खंबीरपणे ईडी चौकशीला सामोरे जायला सांगितलं.