घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : जळगाव ठाकरे गटाकडे कशाला? राऊतांनी महाजनांचे नाव घेत...

Lok Sabha 2024 : जळगाव ठाकरे गटाकडे कशाला? राऊतांनी महाजनांचे नाव घेत दिले उत्तर

Subscribe

Lok Sabha Election 2024 : जळगाव लोकसभा महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडे असून या जागेच्या मुद्द्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे आमदार गिरीश महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

सांगली : राज्यात पहिल्या टप्प्याच्या मतदानाला आता केवळ 11 दिवस शिल्लक राहिले आहेत. तरी देखील महाविकास आघाडी असो किंवा महायुतीत असो दोघांकडूनही जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आलेला नाही. अद्यापही जागा वाटपाचा तिढा कायम असल्याने कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार, हे निश्चित होऊ शकलेले नाही. पण काही जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे. जळगाव लोकसभा महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडे असून या जागेच्या मुद्द्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे आमदार गिरीश महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधला. (Lok Sabha Election 2024 Sanjay Raut criticizes Girish Mahajan)

खासदार संजय राऊत यांनी आज (ता. 07 एप्रिल) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना गिरीश महाजन यांनी त्यांचा उल्लेख मुंगेरीलाल केल्याचे सांगितले. ज्यानंतर राऊतांनी या टीकेला उत्तर देताना म्हटले की, गिरीश महाजन यांनी त्यांच्या जळगावकडे पाहावे. ती लोकसभा त्यांनी वाचवावी. गिरीश महाजन यांना त्यांची जागा दाखवण्यासाठीच आम्ही तिथे शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार दिला आहे. इतक्या वर्ष शिवसेनेने भाजपासाठी ती जागा सोडली होती. मात्र, यावेळी शिवसेनेने ती जागा मागून तिथे उमेदवार उभा केला असल्याचे संजय राऊतांकडून स्पष्ट करण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा… Sanjay Raut : मैत्रीपूर्ण लढतीवर संजय राऊतांचे सूचक वक्तव्य, काँग्रेसला लगावला टोला

काय म्हणाले होते गिरीश महाजन?

दोन महिन्यात आमची सत्ता येतेय. त्यांच्या ईडी, सीबीआयने बंद केलेल्या फाईल ओपन केल्या तर नारायण राणे तिहार जेलमध्ये जातील, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले होते. राऊतांच्या या टीकेला उत्तर देताना गिरीश महाजन यांनी म्हटले होते की, ‘संजय राऊत म्हणतात की, आमचे सरकार आले तर आम्ही नारायण राणे यांना जेलमध्ये टाकू. आता केंद्रामध्ये यांचे सरकार केव्हा येणार? 4 तारखेचा निकाल लागू द्या आमचे सरकार येणार आहे आणि उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार आहे. आता काय बोलावे लोकांना? असे वक्तव्य करत गिरीश महाजन यांनी मिश्किल भाष्य करत संजय राऊत यांच्यावर टीका केली. किती यांचे मुंगेरीलाल के हसीन सपने… मुंगेरीलालही असे स्वप्न बघत नव्हता. इतके भयंकर स्वप्न संजय राऊत यांना पाडायला लागले आहे, असा टोला महाजनांनी लगावला होता.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : रामटेक, यवतमाळ-वाशिम मतदारसंघ महायुती मोठ्या फरकाने जिंकेल – एकनाथ शिंदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -