घरनवी मुंबईNavimumbai police : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेरुळमध्ये पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

Navimumbai police : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेरुळमध्ये पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

Subscribe

नवी मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन नोडनुसार पोलीस ठाण्यात सुरु करण्यात आले आहे. बांगलादेशी नागरिक, अंमली पदार्थ बाळगणाऱ्यावर करडी नजर राहणार आहे. यापुढे देखील पोलिसांची कारवाई सुरु राहील. - मिलिंद भारंबे, नवी मुंबई पोलीस आयुक्त.

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने नवी मुंबई पोलिसांनी रेकॉर्ड वरील आरोपी, पाहिजे आरोपी, गुंड, हिस्ट्री सीटर तसेच अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांची झाडाझडती सुरु केली आहे. त्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या भागामध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगार आणि बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. नेरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यासाठी पोलीस आयुक्तालयातील इतर पोलीस ठाण्यातील अतिरिक्त मनुष्यबळ तसेच राईट कंट्रोल पोलीस पथक मागवून २१ पोलीस अधिकारी आणि ९६ पोलीस अंमलदार यांची १४ तुकड्यांमध्ये विभागणी करण्यात आली.(Police combing operation in Nerul in the wake of Lok Sabha elections)

पोलिसांनी बालाजी टेकडी परिसरातील झोपडपट्टी मधून मंगेश प्रकाश बोटले (३२) याला ९ हजार किंमतीच्या ८७४ ग्रॅम गांजासह पकडले. त्याचप्रमाणे दारावे गांव, सेक्टर-२३ मधील समर्थ कृपा सोसायटीत बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या जाफर सलाम काझी (३५), हवा बेगम जाफर काझी (३०), नाजमुल सलाम काझी (२५) या तीन बांग्लादेश नागरिकांची देखील धरपकड केली. या कोंबिंकों बिंग ऑपरेशन दरम्यान नेरुळच्या एलपी ब्रिजखाली २ वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला अभिलेखावरील बोनी शंकर सांळुखे (२५) हा तडीपार व्यक्ती पोलिसांच्या हाती लागला.या कारवाई दरम्यान दारु बाळणाऱ्या ३ तसेच दारुचे सेवन करणारे १४ अशा एकूण १७ व्यक्तींविक्तीं रोधात पोलिसांनी कारवाई केली. त्याचप्रमाणे अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या ११ व्यक्तींविक्तीं रोधात देखील कारवाई करण्यात आली. तसेच नेरुळ पोलीस ठाणेच्या हद्दीत ४ ठिकाणी लावण्यात आलेल्या नाकांबदीदरम्यान पोलिसांनी मोटार वाहन कायद्याचे उल्लघंन करणाऱ्या ८० व्यक्तींवर कारवाई केली. ऑपरेशन राबवून गांजा बाळगाणाऱ्यासह ३ बांग्लादेशी नागरिक तसेच हद्दपार केलेला गुन्हेगार अशा एकूण ५ जणांची धरपडक पोलिसांनी केली. त्याशिवाय पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपी, पाहिजे आरोपी, गुंड, हिस्ट्री शीटर, संशयित व्यक्तींची क्तीं तपासणी करुन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे नेरुळ परिसरात वावरणाऱ्या गुन्हेगारांचे तसेच अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या निर्देशानुसार परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -