Sunday, September 24, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health वेगाने वजन कमी करण्यासाठी खा 'ही' Low Calories फळं

वेगाने वजन कमी करण्यासाठी खा ‘ही’ Low Calories फळं

Subscribe

वजन कमी करण्यासाठी योग्य फूड्सची निवड करणे अत्यंत गरजेचे असते. आपल्या डाएटमध्ये लो कॅलरीज फळांचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. स्वादिष्ट आणि पौष्टिक फळांचा आनंद घेत वजन कमी करू शकतो. अशा फळातून व्हिटॅमिन्स, खनिज आणि फायबर सुद्धा मिळतात. तर वजन कमी करण्यासाटी पुढील काही लो कॅलरीज फळांबद्दल आपण अधिक जाणून घेऊयात. (low calories fruits for weight loss)

-कलिंगड

- Advertisement -


आपल्या हाय वॉटर कंटेट आणि लो कॅलरी असणारे कलिंगड वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. असे मानले जाते की, एक कप सर्विंगमध्ये जवळजवळ 46 कॅलरीज असतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड भरपूर प्रमाणात खाल्ले जातात.

-खरबूज

- Advertisement -


गोड, रसाळ आणि लो कॅलरीज असणारे खरबूज तुम्ही वजन कमी करण्यासाठी फॉलो करत असलेल्या डाएटमध्ये खाऊ शकता. यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असतात. जे ब्लड प्रेशरला हेल्दी ठेवण्यासाठी मदत करता.

-स्ट्रॉबेरी

अँन्टीऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सी युक्त असलेल्या स्ट्रॉबेरीत कॅलरीज कमी असतात. त्याचसोबत मेटाबॉलिज्म वाढणे आणि फॅट बर्न करण्यासाठी सुद्धा मदत करतात.

-पपई


पचनासंबंधित समस्येपासून दूर राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी तुम्ही पपई खाऊ शकते. हे फायबरचे एक उत्तम स्रोत आहे. पपई खाल्ल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरल्यासारखे राहते.

-पपनस


वजन कमी करण्यासाठी तुम्ही पपनस खाऊ शकता. यामुळे रक्तातील साखर कंट्रोल करण्यास मदत होईल.


हेही वाचा- पोटाची चरबी कमी करतील ‘हे’ फूड कॉम्बिनेशन

- Advertisment -

Manini