घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये खर्गेपुत्राची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत निषेध

नाशिकमध्ये खर्गेपुत्राची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत निषेध

Subscribe

भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने रेडक्रॉस सिग्नल येथे आंदोलन

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र व काँग्रेसचे कर्नाटकातील मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर निषेधार्ह वक्तव्य केले. सदर विकृत वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने शहरातील रेडक्रॉस सिग्नल येथे तिरडी आंदोलन करण्यात आले. यावेळी खर्गेपुत्राचा पुतळा जाळण्यात आला.

खर्गे यांनी आपल्या वक्तव्यात सावरकरांची प्रतिमा कर्नाटक विधानसभेतून काढून टाकण्यात यावी अशी मागणी केली. याविरोधात देशभरातील राष्ट्रप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विविध स्तरांवरून या वक्तव्याचा निषेध होत आहे. भाजप युवा मोर्चा नाशिकतर्फे शुक्रवारी सकाळी रेडक्रॉस सिग्नल येथे तिरडी आंदोलन करत खर्गेंचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी अध्यक्ष सागर शेलार म्हणाले, “काँग्रेसचा सावरकर द्वेष जगजाहीर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या सूर्यावर आरोप करण्याची लायकी सुद्धा या पप्पू गँगची नाही. सावरकरांवर सतत गरळ ओकणार्‍या काँग्रेससोबत असलेल्या उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी आता स्वतःची भूमिका स्पष्ट करावी. सोयीचे हिंदुत्व आणि सावरकरद्वेष्ट्या काँग्रेस बाबत दुटप्पी भूमिका हाच ठाकरेंच्या सत्तालोभाचा खरा चेहरा आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी सावरकरांवर निषेधार्ह बोलणे बंद करावे आणि असल्या वाचाळवीरांच्या समर्थनार्थ पुढे येणार्‍यांनी सावध व्हावे अन्यथा त्यांना आमच्या तीव्र रोषास सामोरे जावे लागेल असा इशारा यावेळी युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आला.

- Advertisement -

यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जाधव, युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर शेलार, नाशिक लोकसभा समन्वयक गिरीश पालवे, सरचिटणीस नाना शिलेदार, वसंत उशीर, शहर उपाध्यक्ष मीनल भोसले, प्रदेश महामंत्री योगेश मैंद, प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत विजय पाटील, क्रीडा संयोजक विजय बनसोडे, महीला मोर्चा सोनाली ठाकरे, सरचिटणीस शिवा जाधव, डॉ. वैभव महाले, प्रशांत वाघ, प्रवीण भाटे, अमोल पाटील, पवन उगले, विनोद येवले, सचिन मोरे, संदीप शिरोळे, कमलेश पिंगळे, सौरभ निमसे, तुषार नाटकर, उमेश शिंदे, गौरव घोलप, गौरव केदारे, सचिन शेजवळ, अंकुश जोशी, शरद आढाव, विशाल पगार, निलेश पवार, आकाश मोरे, विक्रांत गांगुर्डे, विशाल पगार, प्रतीक शुक्ल, मुफद्दल पेंटर, भाविक तोरवने, अनिकेत सोनवणे, ऋषिकेश शिरसाठ, अमित चव्हाण, विजय गायखे, रविंद्र गांगुर्डे, पार्थ मानकर, हर्षल आहेर, राज चव्हाण, ऋषिकेश फुले, भूषण शहाणेे, सुरज चव्हाण, शुभम जाधव, वैभव दराडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व सावरकरप्रेमी उपस्थित होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -