घरदेश-विदेशPersonal Data Leak : दोन वर्षात 260 कोटी लोकांचा पर्सनल डेटा लीक,...

Personal Data Leak : दोन वर्षात 260 कोटी लोकांचा पर्सनल डेटा लीक, APPLE चा दावा

Subscribe

Personal Data Lea : आयफोन निर्माता अॅपल कंपनीने एक धक्कादयाक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. कंपनीने मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक डॉ. स्टुअर्ट मॅडनिक यांनी एका संशोधनात एक माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की डेटाचे चोरी करणे किंवा हॅकिंग ही एक महामारी बनली आहे. आणि यातून कोणीही वाचलेले नाही. हॅकर्स प्रत्येकाचा डेटा चोरत आहेत. 2013 आणि 2022 दरम्यान डेटा उल्लंघनाची एकूण संख्या तिपटीने वाढली आहे, केवळ गेल्या दोन वर्षांत 2.6 अब्ज लोकांचा पर्सनल डेटा लीक झाल्याची माहिती या रिपोर्टमध्यून समोर आली आहे.

हेही वाचा… धक्कादायक! पासपोर्ट संबंधीच्या माहितीची चोरी; तब्बल 81.15 कोटी भारतीयांचा डेटा विक्रीला

- Advertisement -

या अहवालात असे म्हटलं आहे की, की क्लाऊड स्टोरेजपेक्षा अधिक सुरक्षित अशा सिक्युरिटी सिस्टीमची आपल्याला गरज आहे, जसे की एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, गेल्या वर्षीच्या अहवालापासून आणि iCloud साठी प्रगत डेटा संरक्षण लाँच केल्यापासून अधिक आवश्यक बनले आहे. ऍपल आपल्या वापरकर्त्यांचा डेटा एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे संरक्षित करते. गेल्या वर्षी, कंपनीने iCloud साठी Advanced Data Protection नावाचे वैशिष्ट्य जारी केले होते, जे वापरकर्त्यांच्या डेटाला अधिक संरक्षण देते.

गेल्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांचे आयफोन हॅक होत असल्याचा आरोप केला जात होता. यावर अॅपल कंपनीने स्वत:च याबाबतची माहिती दिली असं म्हटलं जात होतं. गेल्या महिन्यात 81.5 कोटी भारतीयांना डेटा डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं वृत्त समोर आल. गेल्या दोन आठवड्यापूर्वी ताज हॉटेलच्या 15 लाख ग्राहकांचा पर्सनल डेटा लीक झाला होता, अशी माहिती समोर आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -