घरमनोरंजनआलियासाठी रणबीर स्वतःच काम सोडून येतो

आलियासाठी रणबीर स्वतःच काम सोडून येतो

Subscribe

आलिया भट आणि रणबीर कपूर ही बॉलीवूडची प्रसिद्ध जोडी आहे. आणि आता आलिया आणि रणवीर आई बाबाही झाले आहेत. त्यांना राहा नावाची मुलगी सुद्धा आहे. पण आलियाला जेव्हा शूटला जायचं असतं तेव्हा तिची चांगलीच तारांबळ उडते आणि त्यावेळी रणबीर मात्र आपलं काम सोडून तिच्याजवळ हजर असतो. असं तिने सांगितले आहे . पण नक्की आलिया तिच्या नात्याबद्दल काय म्हणते ? यासाठी संपूर्ण लेख वाचा

आलिया ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये हे वक्तव्य केलं आहे.ती म्हणते की, “गरोदरपणा नंतर शरीरात अनेक बदल होतात. आजही मला अनेक बदलांना सामोरे जावे लागत आहे . जेव्हा मी शूट साठी घराबाहेर पडते तेव्हा राहाला सोडून जावं लागतं आणि त्यामुळे आपल्या मुलीसोबत न राहण्याचे गिल्ट सुद्धा मला वारंवार वाटतं. कधी कधी घर शूट यामध्ये मी गोंधळून जाते आणि मला काय करावं सुचत नाही. अशावेळी जेव्हा रणबीरला मी कॉल करते तेव्हा तो नेहमी आपलं काम सोडून मला न्यायला येतो आणि त्यामुळेच मी रिलॅक्स फील करते”असं आलियाने करणच्या शो मध्ये सांगितले आहे. यावेळी बॉलिवूडची बेबो म्हणजे करीन कपूरही तिच्या सोबत होती.

- Advertisement -

रणबीर नेहमीच एक वडील म्हणून त्याचबरोबर पती म्हणून योग्य आहे असं आलिया सांगत असते. त्याचबरोबर आलियाने आपल्या मुलीच्या फोटोज विषयी सुद्धा विधान केलं होतं. ती म्हणते की, “राहाचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि मला याची कुठेच भीती वाटत नाही असं नाही,पण ती अजून खूप लहान आहे तिचा कंटेंट साठी इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावर वापर व्हावा असं मला वाटत नाही. पण ती तिच्या आयुष्यात हेल्दी आणि खूप आनंदी असते आणि त्यामुळेच आम्ही सुद्धा खूप सुखी आहोत” असं आलिया सांगितले आहे.

सध्या आलिया नव्या चित्रपटात दिसेल अशी माहिती समोर येत आहे. पण तोवर राहाचे फोटोज आणि व्हिडिओज सुद्धा सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालताना दिसत आहे .

- Advertisement -

हेही वाचा :जया बच्चन यांच्या वडिलांचा लग्नाला होता नकार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -