घरमहाराष्ट्रAwhad : दोन फोटो शेअर करत जितेंद्र आव्हाड म्हणतात, मुंबईची काय अवस्था...

Awhad : दोन फोटो शेअर करत जितेंद्र आव्हाड म्हणतात, मुंबईची काय अवस्था झाली आहे ते बघा!

Subscribe

मुंबई : मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्याची गरज असल्याचे सांगणाऱ्या राज्य सरकारने पहिली ते दहावी आता मराठी सक्तीचे केले असले तरी, रेल्वे आणि मुंबई महापालिकेत गुजराती भाषेने घुसखोरी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी यासंबंधीच दोन फोटो सोशल मीडियावर शेअर करत, मुंबईची काय अवस्था झाली आहे ते बघा, असे म्हटले आहे.

हेही वाचा – Sharad Pawar : शरद पवारांनी हटकताच जयंत पाटलांनी शब्द घेतले मागे, नेमके काय घडले?

- Advertisement -

महाराष्ट्राची मराठी भाषा आपण केवळ बोलण्यापूर्ती वापरतो. ज्या मराठी भाषेची इतर देशांना भुरळ पडली आहे, ज्या मराठी संस्कृतीचा इतर देशांमध्ये गोडवा गायला जातो, त्या मराठी भाषेला आता ज्ञानभाषा करण्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच झालेल्या विश्व मराठी संमेलनात म्हटले होते. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षात पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली.

- Advertisement -

दुसरीकडे, वेदांत फॉक्सकॉन, टाटा एअरबस हे प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवून नेले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाच मुद्दा उपस्थित करताना, मासेमारी करायला गुजरातच्या एलईडी बोटी येत आहे. सगळेच गुजरातला नेले जात असल्याची टीका केली होती.

हेही वाचा – Chitra Wagh : फडणवीस यांच्यासारखा नेता एकीकडे आणि…, चित्रा वाघ यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई महानगरपालिकेची नोटीस आणि रल्वे तिकिटाचा फोटो शेअऱ केला आहे. मुंबईचे रेल्वे तिकीट आता गुजराती भाषेत मिळायला लागले आहे. तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेची टेंडर नोटीस हीदेखील गुजराती भाषेत छापली गेली आहे. बघा, मराठी मनाला हे पटते आहे का? झोपलेले राहाल तर महाराष्ट्रात गुजराती ही प्रमुख भाषा झालेली असेल. आता तरी झोपेतून उठा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

तथापि, गुजराती भाषेतील रेल्वे तिकीट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मध्य रेल्वेवरील डोंबिवली ते घाटकोपरच्या प्रवासाचे हे तिकीट असून 6 मार्च रोजी हे तिकीट छापल्याची त्यावर नोंद आहे. प्रिंटरमध्ये बिघाड झाल्याने तिकीटाची अशी प्रत छापून आली असल्याची सबब रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा – Ajit Pawar : काही लोकांनी निलेश लंकेच्या डोक्यात खासदारकीची हवा घातलीय; अजित पवारांची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -