घरताज्या घडामोडी'मराठी भाषा गौरव दिन', मातृभाषेचा गौरव अन् कुसुमाग्रजांना अभिवादन

‘मराठी भाषा गौरव दिन’, मातृभाषेचा गौरव अन् कुसुमाग्रजांना अभिवादन

Subscribe

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आज 27 फेब्रुवारी, मराठी भाषा गौरव दिन. महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी दरवर्षी 27 फेब्रुवारी हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातील मराठी भाषेला ज्ञानभाषा म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी कुसुमाग्रज यांनी अथक मेहनत घेतली. त्यामुळे आपल्या मातृभाषेचा गौरव करण्यासाठी आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्ताने 27 फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने 21 जानेवारी 2013 रोजी घेतला.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं दैदीप्यमान रत्‍न म्हणजे, ‘कुसुमाग्रज’

महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच, कुसुमाग्रज यांचं मूळ नाव विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रज यांचा जन्म नाशिक येथे 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. कुसुमाग्रज यांनी आपल्या आत्मनिष्ठ प्रतिभेनं आणि समाजनिष्ठ भावस्पर्शी लेखणीनं जागतिक दर्जाचं लेखन केलं. केवळ महाराष्ट्रातील मराठी साहित्यविश्वातच नाही, तर चित्रपट, नाटक अशा सर्व साहित्यनिर्मितीत त्यांनी भरीव काम केले; पण त्यांनी कवितालेखन हे विशेष कुसुमाग्रज या नावानेच केले. त्यामुळे अनेकांना कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या कवितांपेक्षा ‘कुसुमाग्रज’ यांच्या कविता हे लक्षात राहते. त्यामुळे आजही त्यांचे मूळ नाव जितके कोणाच्या लक्षात येत नाही तितके टोपणनाव पटकन लक्षात येते. त्यामुळे अनेकांना त्यांच्या कुसुमाग्रज या नावामागे काय अर्थ आहे हे जाणून घेण्याची फार उत्सुकता आहे.

कुसुमाग्रज नाव का धारण केले?

कुसुमाग्रजांचा जन्म नाशिक येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कुसुमाग्रजांचे वडील वकील होते, वकिलाच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले, कुसुमाग्रजांचे बालपण येथेच गेले कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती, एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून ‘कुसुमाग्रज’ असे नाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर कवी ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. कुसुमाग्रज यांना त्यांच्या नटसम्राट या साहित्यकृतीबद्दल मानाच्या ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले.

- Advertisement -

‘मराठी राजभाषा दिन’ अन् ‘मराठी भाषा गौरव दिन’ मध्ये फरक काय?

कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्तानं 27 फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र सरकारनं घेतला. परंतु, याच दिवसाला अनेक जण ‘मराठी राजभाषा दिन’ असंही म्हणतात. पण ‘मराठी भाषा गौरव दिवस’ आणि ‘मराठी राजभाषा दिवस’ हे दोन्ही वेगवेगळे आहेत.

महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं 10 एप्रिल 1997 रोजी काढलेल्या परिपत्रकात 1 मे हा ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसा, तो महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून 1 मे रोजी साजरा करण्यात येत होता. परंतु, कालांतरानं तो विस्मृतीत गेला. त्यामुळे शासनाला पुन्हा परिपत्रक वाढावं लागलं. त्यामुळे आज ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जातो आणि 1 मे रोजी ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा केला जातो.

मराठीसाठी तीन दिवस :

1 मे – ‘मराठी राजभाषा दिन’

21 फेब्रुवारी – ‘जागतिक मातृभाषा दिन’

27  फेब्रुवारी – ‘मराठी भाषा गौरव दिन’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -