घरदेश-विदेशTwitter Down : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरीवल X Server Down, नेटकरी हैराण

Twitter Down : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरीवल X Server Down, नेटकरी हैराण

Subscribe

मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांच्या वापरात येणारे X हे सोशल मीडिया अॅप म्हणजेच आधीचे ट्विटर अॅप हे आज (ता. 21 डिसेंबर) गेल्या तासाभरासाठी अचानक डाऊन झालेले होते. ज्यामुळे नेटकऱ्यांना X हे सोशल मीडिया अॅप वापरण्यात मोठ्या अडचणी आल्या.

नवी दिल्ली : मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांच्या वापरात येणारे X हे सोशल मीडिया अॅप म्हणजेच आधीचे ट्विटर अॅप हे आज (ता. 21 डिसेंबर) गेल्या तासाभरासाठी अचानक डाऊन झालेले होते. ज्यामुळे नेटकऱ्यांना X हे सोशल मीडिया अॅप वापरण्यात मोठ्या अडचणी आल्या. तर काही नेटकरी हे X सर्व्हर डाऊन झाल्यामुळे चांगलेच हैराण झाले होते. X सर्व्हर डाऊन झाल्यानंतर काही वेळातच #TwitterDown, #XServerDown असे ट्रेंड झाले. X या सोशल मीडिया साइटवर कोणत्याही पोस्ट अथवा मॅसेज दिसत नसल्याची तक्रारही सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर नेटकऱ्यांकडून करण्यात आली. (Twitter Down : Social media platform X Server Down)

हेही वाचा… Insulin : भारतातील मधुमेहींसाठी आनंदाची बातमी, स्वस्तात इन्सुलिन होणार उपलब्ध

- Advertisement -

X हे सोशल मीडिया अॅप याआधी देखील अनेकदा डाऊन झालेले पाहायला मिळाले. महत्त्वाची बाब म्हणजे एलन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर यामध्ये तांत्रिक अडचणी येण्यात वाढ झाली आहे. आज नेटकऱ्यांना X वर तासभर कोणत्याही पोस्ट दिसल्या नाही. तर कोणालाही ट्वीट करता आले नाही. फक्त भारतातच नाही तर X सोशल मीडिया अॅपची ही सेवा संपूर्ण जगभरात ठप्प झाली होती. DownDetector या साइटकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 47,000 पेक्षा जास्त अमेरिकन वापरकर्त्यांना एक्स आणि एक्स प्रो वर पोस्ट करण्यास किंवा पोस्ट बघण्यात अडथळा निर्माण झाला आहे. अमेरिकेसोबतच बाकी देशातील वापरकर्त्यांनादेखील एक्स जाऊन असल्याने समस्यांचा सामना करावा लागला आहे. याच वेबसाईटने सांगितल्या नुसार पहाटे ट्विटरमध्ये म्हणजेच एक्समध्ये बिघाड झाल्याचे दिसून आले आहे.

- Advertisement -

याआधी देखील अनेकदा X हे सोशल मीडिया अॅप बंद पडले होते. अचानकपणे सर्व्हर डाऊन झाल्याने नेटकऱ्यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. परंतु तेव्हाही नेमक्या कोणत्या कारणामुळे हे अॅप डाऊन झाले याबाबतची माहिती समोर येऊ शकली नाही. तर ट्विटरची सेवा ठप्प होण्यामागे नेमकी कारणे कोणती होती हे आजही स्पष्ट होऊ शकले नाही. ट्विटर डाऊन झाल्याने भारतातील लोक सतत हे ट्विटर अकाउंट सुरू झाले का याची तपासणी करत होते. भारतात ट्विटर युजर्सची संख्या मोठी असल्याने भारतातील युजर्सवर ट्विटर ठप्प झाल्याचा मोठा परिणाम दिसून आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -