घरमहाराष्ट्रअहो बावनकुळे साहेब..., फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदावरून अनिल देशमुख यांचा टोला

अहो बावनकुळे साहेब…, फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदावरून अनिल देशमुख यांचा टोला

Subscribe

मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच ठाण्यामध्ये, 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर तुम्हाला मुख्यमंत्री कोण हवा आहे, असा प्रश्न केला असता भाजपा कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस, असे उत्तर एकमुखाने दिले होते. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे.

हेही वाचा – “आम्हाला धमक्या देऊ नका, नाही तर…”, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

- Advertisement -

भाजपाच्या महाविजय 2024 अभियानांतर्गत चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचे दौरे करत असून त्यांनी आतापर्यंत हजारो कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. बावनकुळे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे शहर, कोपरी पाचपाखाडी, ओवळा-माजिवाडा व मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांसोबत मंगळवारी थेट संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असावेत, अशी भावना व्यक्त केली. त्यावर बावनकुळे यांनी, एवढ्यावरच न थांबता तुम्हाला जो मुख्यमंत्री हवा आहे, त्यासाठी आतापासून कामाला लागा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

- Advertisement -

ठाण्यानंतर वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात बावनकुळे यांचा संवाद कार्यक्रम झाला. तिथेही बावनकुळे यांनी उपस्थित नेते आणि कार्यकर्त्यांना हाच प्रश्न केला. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या कृतीमुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाने या मेळाव्याच्या माध्यमातून दिलेल्या धक्कातंत्राने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा – नऊ वर्षांत कर्जबुडव्यांना मात्र ‘अच्छे दिन’, ठाकरे गटाचे मोदी सरकारवर शरसंधान

याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी ट्वीट करत विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. अहो बावनकुळे साहेब… देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पहिले आमदार व्हावे लागेल. तुमच्याच पक्षाचे लोक नागपूरमध्ये निवडणुकीची वाट पाहत आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -