घरमनोरंजनEsha Deol Divorce :ती मला नेहमी... या सवयींमुळे ईशाचा पती होता नाराज!

Esha Deol Divorce :ती मला नेहमी… या सवयींमुळे ईशाचा पती होता नाराज!

Subscribe

अभिनेते धर्मेंद्र यांची लेक ईशा देओल ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. ईशा देओलच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. अनेक दिवसांपासून ईशा आणि तिचा नवरा भरत यांच्यात काही ठीक चालत नसून दोघे वेगळे झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या जोडप्याने कोणतीही औपचारिक माहिती देणं टाळलं होतं. पण आता दोघांनीही अखेर वैवाहिक आयुष्याविषयी खुलासा केला आहे. आता त्यांनी घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले आहे.

दिल्ली टाइम्सने शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये या जोडप्याने त्यांच्या संयुक्त निवेदनात, 11 वर्षांच्या संसारानंतर परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यासाठी आमची मुलं महत्वाची आहेत. त्यांच्या आनंदाचा आणि हिताचा आम्ही नेहमीच विचार करू. असं म्हणत दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे. यात आता सोशल मीडियावर त्यांच्यात नेमक्या कोणत्या कारणामुळे घटस्फोट झाला याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

- Advertisement -

ईशाचा पती भरत तख्तानी याने फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या नात्यातील अनेक गुपित उघड केली होती. भरत तख्तानी याने सांगितलं की, “मला जास्त वाद घालायला घालायला आवडत नाही, पण तरीही ती लहान- सहान गोष्टींवरुन वाद घालायची. जेव्हा कधी आमच्यात वाद झाला तेव्हा मी नेहमी माघार घेऊन वाद थांबवण्याचा प्रयत्न करायचो. कारण माझ्यात कोणताही अहंकार नव्हता.” भरत असंही म्हणतो की, ईशा माझ्याबाबतीत खूप पझेसिव्ह होती. मी सुद्धा पझेसिव्ह होतो मात्र तिच्या इतका नाही. ती मला नेहमी बंधनात बांधून ठेवायची. जेव्हा पण मी माझ्या जुन्या मित्रांसोबत असायचो.तेव्हा ती मित्रांना भेटू द्यायची नाही. नेहमी बंधनात ठेवायची

ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी 29 जून 2012 को इस्कॉन मंदिरात लग्न केलं होतं. लग्नाच्या 5 वर्षांनंतर ईशा देओलने मुलीला जन्म दिला. त्यानंतर 2019 मध्ये देखील ईशा हिने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. ईशा- भरत यांच्या दोन्ही मुलींची नावं राध्या आणि मिराया अशी आहेत. ईशा मुलींसोबत फोटो पोस्ट करत असते. आता मात्र 11 वर्षानंतर दोघांचा संसार मोडला आहे.

- Advertisement -

कोण आहे भरत तख्तानी?
भरत तख्तानी हा मुंबईतील एचआर कॉलेजमधून वाणिज्य आणि अर्थशास्त्र विषयात पदवीधर आहेत. ईशा आणि भरत हे वेगवेगळ्या शाळांमध्ये होते, पण ते एका आंतरशालेय स्पर्धेदरम्यान एकमेकांना भेटले. कॉलेज संपल्यानंतर भरतने वडिलांचा व्यवसाय पुढे नेण्याचे काम केले. भरत तख्तानी हा आरजी बँगल प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीचे मालक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -