Sunday, February 25, 2024
घरमानिनीHealthफक्त पिझ्झाच नाही 'हे' पदार्थ खाल्याने देखील आयुष्य होते कमी

फक्त पिझ्झाच नाही ‘हे’ पदार्थ खाल्याने देखील आयुष्य होते कमी

Subscribe

प्रत्येक व्यक्तिला आपण दीर्घायुष्यी असावं असं वाटतं. परंतु आपल्या आरोग्याची काळजी नीट न घेणे, आहार, व्यायाम, अपूर्ण झोप यांसारख्या हलगर्जीपणामुळे अनेकांना वेगवेगळ्या शारिरीक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे हृदयासंबंधित आजार, फुप्फुसासंबंधित आजार, मधुमेह यांसारखे अनेक विविध आजार आहेत. ज्यामुळे तुमचं आयुष्य कमी होऊ शकतं. विज्ञानाच्या मते, जर कोणी नियमीत आहारामध्ये चांगल्या पदार्थांचे सेवन करत असेल तर त्याचे आयुष्य वाढते आणि जर कोणी अनहेल्दी पदार्थांचे सेवन करत असेल तर त्या व्यक्तिचे आयुष्य आपोआप कमी होते.

या पदार्थांचे सेवन केल्यास कमी होते आयुष्य

- Advertisement -

हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, काही पदार्थ खाल्ल्यावर आपले आयुष्य वाढते. तर काही पदार्थ खाल्यास आपलं आयुष्य कमी देखील होते. उदाहरणार्थ, जर कोणी नट्सचे सेवन करत असेल तर त्या व्यक्तिचे आयुष्य 26 मिनिटांनी वाढते. परंतु जर कोणी फास्ट फूडमधील हॉट डॉग खात असेल तर त्या व्यक्तिचे आयुष्य 36 मिनिटांनी कमी होते. याबरोबरच पीनट बटर खाल्ल्याने देखील तुमचे आयुष्य अर्ध्या तासापर्यंत वाढते.

6 पदार्थांवर करण्यात आला रिसर्च

- Advertisement -

एका हेल्थ रिसर्चमध्ये काही पदार्थांवर अभ्यास करण्यात आला. त्यावेळी तेथील वैज्ञानिकांनी जवळपास 6 हजार वेगवेगळ्या पदार्थांचं विश्लेषण केले. ज्यामध्ये नाश्त्यामध्ये खाल्ली जाणारी, जेवणामध्ये खाणारे आणि शीत पेयांमध्ये पिले जाणाऱ्या पदार्थांचा समावेश होता. त्यावेळी त्यांच्या निर्दशनास आलं की, जर कोणी व्यक्ति बाजारातील डबा बंद पदार्थांचे सेवन करत असेल तर व्यक्ति दररोज आपल्या आयुष्यातील 48 मिनिट कमी करते.

59,000+ Fast Food Pictures

या पदार्थांचे सेवन केल्याने आयुष्य होतं कमी

  • हॉट डॉग : तुमच्या आयुष्यातील 36 मिनिट कमी करते.
  • प्रोसेस्ड मीट : तुमच्या आयुष्यातील 26 मिनिट कमी करते.
  • चीज बर्गर : तुमच्या आयुष्यातील 8.8 मिनिट कमी करते.
  • सॉफ्ट ड्रिंक : तुमच्या आयुष्यातील 12.4 मिनिट कमी करते.
  • पिझ्झा : तुमच्या आयुष्यातील 7.8 मिनिट कमी करते.

या पदार्थांचे सेवन केल्याने आयुष्य वाढते

  • केळी : तुमच्या आयुष्यातील 13.5 मिनिट वाढवते.
  • टोमॅटो : तुमच्या आयुष्यातील 3.8 मिनिट वाढवते.
  • अवोकाडो : तुमच्या आयुष्यातील 1.5 मिनिट वाढवते.
  • सेल्मन मासा : तुमच्या आयुष्यातील 13.5 मिनिट वाढवते.
  • पीनट बटर : तुमच्या आयुष्यातील 33 मिनिट वाढवते.

हेही वाचा :

साखर खाणं दातांसाठी हानिकारक?

- Advertisment -

Manini