घररायगडCongress : काँग्रेसच्या आंदोलनामुळे विद्यापीठातील 10 हजार विद्यार्थ्यांना न्याय - अतुल लोंढे

Congress : काँग्रेसच्या आंदोलनामुळे विद्यापीठातील 10 हजार विद्यार्थ्यांना न्याय – अतुल लोंढे

Subscribe

मुंबई : रायगड जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातील गैरकारभाराने हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पेपर फेरतपासणीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडे पैसे मागितले जात होते. विद्यापीठाच्या गैरकारभाराविरोधात विद्यार्थ्यांसह काँग्रेस पक्षाने विद्यापीठात आंदोलन केले. त्यानंतर जाग आलेल्या कुलगुरुंनी विद्यापीठातील गैरकारभाराला आळा घालून ज्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे, त्यांचे पेपर 7 दिवसात तपासून निकाल जाहीर केला जाईल आणि पाचव्या सेमिस्टरची परीक्षा घेतली जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या विद्यापीठातील 10 हजार विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे. (Congress Justice for 10 thousand students of the university due to Congress agitation Atul Londhe)

हेही वाचा – Chalisgaon Firing Case : 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; भाजपाच्या बाळासाहेब मोरेंची प्रकृती चिंताजनक!

- Advertisement -

पत्रकारांना माहिती देताना अतुल लोंढे म्हणाले की, बुधवारी मी विद्यार्थ्यांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, जि. रायगड याठिकाणी जाऊन आंदोलन केले व कुलगुरू कारभारी काळे यांची भेट घेऊन परीक्षेतील गैरप्रकार व निकालातील त्रुटी दूर करण्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले हे सुद्धा त्याठिकाणी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेतल्यावर, ज्या विद्यार्थ्यांना अन्याय झाल्याची भावना आहे, त्यांनी 8 ते 12 फेब्रुवारीदरम्यान फेरतपासणीसाठी अर्ज करावेत, 13 फेब्रुवारीनंतर पुढच्या 7 दिवसात म्हणजे 20 फेब्रुवारीपर्यंत फेरतपासणीचा निकाल येईल आणि या फेरतपासणीत जे विद्यार्थी पास होतील, त्यांची पाचव्या सेमिस्टरची परीक्षा घेण्यात येईल, असे कुलगुरुंनी सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Devendra Fadnavis : तंत्रज्ञानामध्ये लोकांचं आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता; सरकारचा गुगलसोबत सामंजस्य करार

न्याय मिळाला नाही तर पुन्हा आंदोलन करू – अतुल लोंढे

विद्यापीठातील 10 हजार विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे. विद्यापिठासंदर्भात उपस्थित झालेल्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल व त्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल. असे आश्वासन आज झालेल्या बैठकीत कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना दिले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे आणि न्याय मिळाला नाही तर पुन्हा मोठे आंदोलन करू, असा इशारा अतुल लोंढे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -