घरमहाराष्ट्रमराठा आरक्षणाबाबत सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका; म्हणाल्या "ट्रिपल इंजिन..."

मराठा आरक्षणाबाबत सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका; म्हणाल्या “ट्रिपल इंजिन…”

Subscribe

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत ट्रिपल इंजिन खोके सरकार सपशेल अपयश ठरले आहे, असा अप्रत्यक्ष टीका राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहान बुधवारी सर्वपक्षीय बैठकीतील सर्व नेत्यांनी केले आहे.

मराठा आरक्षणासंदर्भातील प्रश्नांवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे भ्रष्ट आणि जुमलेबाज सरकार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या 30 दिवसांची मुदत ते पूर्ण करु शकले नाहीत. आज जारंगे पाटलांच्या मनाचा मोठेपणा होता, म्हणून त्यांनी सरकारला अजून 10 दिवसांचा कालावधी दिला होता. पण, मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम समाजाला केवळ फसवण्याचे काम या सरकारने केले आहे. हे सगळे पाप भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी मिळून केले आहे. आज सरकारने महिला, आरक्षण, महागाई, बेरोजगारी अशा कितीतरी प्रश्‍नांवर हे ट्रिपल इंजिन खोके सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. 200 आमदार आणि 300 खासदार त्यांच्याकडे आहेत. तरीही ते प्रश्‍न सोडवू शकत नाहीत? असा सवाल सुप्रिया सुळे त्यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

हेही वाचा – जनतेची कामे झाली असती तर…, विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा

प्रदूषणासंदर्भात गांभीर्याने काही निर्णय घेण्याची गरज

मुंबईतील प्रदुषणाबाबतही सुप्रिया सुळे म्हणाल्या, बेस्टच्या वरिष्ठांनी याबाबत काही कायदे, नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट देखील केले आहे. त्याचाही आम्ही सगळे अभ्यास करु. मुंबईमध्ये वायू प्रदूषणामुळे वयोवृद्धांसह लहान मुले, महिला यांना फार मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत महापालिकेसह सरकारनेही गांभीर्याने काही निर्णय घेण्याची गरज आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सगळ्या विरोधकांना तुरुंगात डांबा अन् मगच निवडणुका घ्या; ठाकरे गटाचा उपरोधिक सल्ला

सुप्रिया सुळेंनी घेतली आयुक्तांची भेट

मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट मधील कर्मचाऱ्यांना येत असलेल्या अडचणीची पाहणी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केली होते. त्यानंतर या सर्व मागण्यांकरिता महापालिका आयुक्त यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानुसार आज सुप्रिया सुळेंनी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या अनेक मागण्या पूर्ण करण्यात आल्याचे माहिती आयुक्तांनी दिली आहे, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बेस्ट मधील कंत्राटी आणि कायम कर्मचार्‍यांनाही बेस्ट ने पास दिला आहे. ही आनंदाची बाब आहे. दुसर्‍या गोष्टी जसे की स्वच्छतागृहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर यासंदर्भातही वरिष्ठ जातीने लक्ष घालणार आहेत. यासाठी त्यांनी एक महिन्याचा कालावधी मागितला आहे. एक महिन्यानंतर मी स्वत: त्याबाबत आढावा घेणार आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा – पश्चिम महाराष्ट्रातही सापडताहेत कुणबी दाखले; अनेक राजकारण्यांनी याआधीच गुपचूप काढला दाखला

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनससंदर्भात म्हणाल्या…

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, बेस्टच्या बाबत केंद्राने प्रिपेड मीटर संदर्भात जो निर्णय घेतलाय त्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली यामध्ये केंद्राने जे राज्य सरकारला निर्देशित केले आहे, त्याची माहिती आत्ता राज्य सरकारही घेत आहे. त्यामुळे याबाबतची माहिती थोड्याच दिवसांत सर्वसामान्यांना कळेल असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच कंत्राटी कर्मचार्‍यांच्या दिवाळी बोनस संदर्भातही सुप्रिया सुळे म्हणाल्या, कर्मचार्‍यांना अपेक्षेपेक्षा जास्त बोनस देण्याचे आयुक्तांनी आश्‍वासन दिले आहे. त्यासंदर्भातील प्रस्तावही त्यांनी पाठवला आहे. त्यांनी एक महिन्याची मुदत मागितली आहे, तर आपण एक महिना थांबून वाट पाहूया, असा इशाराही सुप्रिया सुळेंनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -