Sunday, September 24, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health Period sex चे फायदे आणि नुकसान

Period sex चे फायदे आणि नुकसान

Subscribe

मासिक पाळी बद्दल समाजात काही प्रकारचे टॅबू आहेत. परंतु या दरम्यान होणारी ब्लीडिंग, क्रॅम्प आणि पाठीत दुखण्याच्या समस्येमुळे नकोसे होते. अशातच मासिक पाळीदरम्यान सेक्स करणे काही महिलांना विचित्र वाटते. याउलट काहींना त्यावेळी मजा येते. मासिक पाळीवेळी शरिरात होणाऱ्या हार्मोनल बदल यावेळी सुखद आनंद देतात. तर जाणून घेऊयात पीरियड सेक्सचे फायदे आणि नुकसानीबद्दल अधिक,

संक्रमणाचा धोका वाढतो
मेडिकल न्यूज टुडेच्या रिसर्जनुसार, सेक्शुअल रिलेशन बिल्डअप करतेवेळी दोन प्रकारच्या संक्रमणांचा धोका असतो. पहिला म्हणजे एसटीआय आणि दुसरा म्हणजे यीस्ट संक्रमण आणि बॅक्टेरियल वेजिनोसिस. यीस्ट संक्रमण सेक्स केल्याशिवाय सुद्धा होण्याची शक्यता असते. खरंतर शरिरात होणाऱ्या हार्मोनल बदलाव याचे एक मोठे कारण असते. हार्मोनल इंबॅलेन्समुळे शरिरात संक्रमण होण्याचा धोका वाढतो. तर संक्रमणादरम्यान, तुम्ही जर सेक्स केल्यास तर पोनिसच्या टोकावर सूज येण्याची शक्यता असते. तसेच एसटीआयचा धोका वाढण्याची शक्यता ही असते.

- Advertisement -

मासिक पाळीवेळी सेक्स करण्याचे फायदे काय?
-ल्युब्रीकेशनची गरज नाही
मासिक पाळीवेळी आर्टिफिशियल ल्युब्रिकेशनची गरज भासत नाही. खरंतर या दरम्यान होणारा डिस्चार्ज ल्युबचे काम करतो. ज्यामुळे इंटरको्स करतेवेळी कंम्फर्ट फिल होते. सेक्स केल्याने लोअर अॅबडोमेनमध्ये होणाऱ्या दुखण्यापासून आराम मिळतो.

- Advertisement -

-तणापासून दूर राहता येते
मासिक पाळी आल्यानंतर आपण उदास होतो. कपड्याला रक्ताचा डाग लागू नये म्हणून अधिक काळजी घेतो. मासिक पाळी वेळी होणारे ब्लिडिंग आणि दुखणे हे काही वेळेस डिस्कंम्फर्टचे कारण ठरते. या दरम्यान बहुतांश महिलांचे मूड स्विंग्स किंवा त्या तणावाखाली असतात. पण अशावेळी सेक्स केल्यास शरिरात ऑक्सीटोनिस हार्मोनचे प्रमाण वाढते. जे तुमच्या मेंदूत जात आपल्यामधील ऑर्गेज्मच्या अनुभवाला प्रोत्साहित करतो. त्यामुळे ताण आपोआप दूर होतो.

-लिबिडो वाढतो
मासिक पाळीवेळी लिबिडो वाढण्याची शक्यता असते. खरंतर शरिरातून होणाऱ्या डिस्चार्जमुळे प्रोजेस्टेरोन हार्मोनचे प्रमाण आपोआप घसरला जातो. अशावेळी टेस्टोस्टेरॉन हार्मोनचा स्तर वरखाली होऊ लागतो. जे याचे मुख्य कारण ठरु शकते. तज्ञांच्या मते, मासिक पाळीदरम्यान सर्वकाही ठीक वाटत नाही. पण हार्मोनल बदलावामुळे सेक्स ड्राइव वाढला जातो.


हेही वाचा- Periods मध्ये पाच दिवसांनंतर ही bleeding होत? मग काळजी घ्या

- Advertisment -

Manini