Saturday, April 27, 2024
घरमानिनीKitchenKitchen Tips : झटपट किचन टिप्स

Kitchen Tips : झटपट किचन टिप्स

Subscribe

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

Earn Money Cooking | Airtasker US

- Advertisement -
  • साबुदाणा खिचडी लुसलुशीत होण्यासाठी ती अर्धवट शिजल्यावर त्यात दोन चमचे दूध घालावे.
  • नेहमीच्या तूरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान आणि वेगळी चव येते. त्यायोगे पालकही खाल्ला जातो.
  • भाजी, डाळी, कडधान्ये आणि पुलाव करताना त्यात पुदिन्याची पाने घालावी. त्यामुळे त्या पदार्थाची पाचकता वाढते.
  • मसाल्यात हिंगाचे खडे ठेवावे. यामुळे स्वाद चांगला येतो.
  • गरमागरम इडली, इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे. यामुळे इडल्या इडली पात्रातून पटापट निघतात.

Cooking with Olive Oil | Olive Wellness Institute

  • भेंडीची भाजी शिजवताना त्यात 2 चमचे दही घालावे. यामुळे भाजी चिकट होत नाही.
  • छोले रात्री भिजवताना त्यात मूठभर हरभरा डाळही भिजवावी, त्याने छोले रस्सादार आणि दाट होतात.
  • सुके खोबरे खराब होऊ नये, यासाठी ते तूरडाळीत ठेवावे.
  • भाजी खारट झाल्यास त्यात उकडलेला बटाटा घालावा. यामुळे खारटपणा मोडण्यास मदत होते.
  • पालेभाज्या सुकल्यास पाण्यात 1 चमचा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालून त्या पाण्यातून काढल्यास भाज्या टवटवीत राहतात.

हेही वाचा :

Kitchen Tips : रुचकर जेवणासाठी खास टिप्स

- Advertisment -

Manini