घरपालघरLok Sabha : बहुजन विकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात; राजेंद्र गावितांना विरोध कायम

Lok Sabha : बहुजन विकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात; राजेंद्र गावितांना विरोध कायम

Subscribe

पालघर लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून उमेदवाराची घोषणा करण्याची औपचारिकता बाकी असल्याची माहिती बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या घोषणेने बविआची भूमिका स्पष्ट झाली आहे. तसेच राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीला विरोध असल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. 

वसई : पालघर लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून उमेदवाराची घोषणा करण्याची औपचारिकता बाकी असल्याची माहिती बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या घोषणेने बविआची भूमिका स्पष्ट झाली आहे. तसेच राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीला विरोध असल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. (Lok Sabha Election 2024 Palghar Lok Sabha Constituency Bahujan Vikas Aghadi in Election Arena Opposition to Rajendra Gavit continues)

सहापैकी तीन आमदार आणि मतदारसंघातील वसई विरार महापालिकेवर असलेली सत्ता पाहता पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीची भूमिका महत्त्वाची मानली जाते. खासदार राजेंद्र गावित यांच्या उमेदवारील आमदार हितेंद्र ठाकूर यांचा विरोध आहे. गावीत उमेदवार नसतील तर ठाकूर उमेदवार उभा करणार नाहीत, असे सांगितले जात होते. राज्यात महायुतीत सामिल असलेल्या हितेंद्र ठाकूर यांनी आपली भूमिका जाहीर केली नव्हती. मात्र, विद्यमान खासदार राजेंद्र गावीत यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याच्या हालचाली महायुतीत सुरू आहेत. गावित शिंदे गट की भाजपाचे उमेदवार असतील याचाच निर्णय होणे शिल्लक आहे. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांनी निवडणुक लढवणार असल्याचे जाहीर करत राजेंद्र गावितांना असलेला विरोध कायम ठेवला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sangli Lok Sabha : काँग्रेस नेत्यांच्या नाराजीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

आपले राज्यातील सर्वच पक्ष, नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. सध्या पालघर जिल्ह्यातील तीन आमदार बविआचे आहेत. निर्णायक भूमिका असलेल्या वसई विरार महापालिकेत 105 नगरसेवक, जिल्हा परिषदेत सत्तेत सहभाग आहे. जिल्ह्यात सर्वाधिक सरपंच बविआचे आहेत. उमेदवार निवडून येण्याची शंभर टक्के खात्री असल्याने नैसर्गिकरित्या पालघरच्या जागेवर आपला हक्क आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी खरे तर आपल्यालाच पाठिंबा द्यायला हवा, असा दावाही हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. आता उमेदवाराचे नाव जाहीर करण्याची औपचारिकता शिल्लक आहे. जिल्हाभर बविआचे मेळावे, सभा सुरू असून कार्यकर्ते कामालाही लागले आहेत. शिट्टी चिन्ह मिळाले नाही तरी कोणतेही चिन्ह मतदारांपर्यंत पोचवण्याची बविआची क्षमता असल्याचेही हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भारती कामडी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीत शिंदे गट आणि भाजपाने जागेवरील आग्रह कायम ठेवल्याने तिढा निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी महायुतीतील नेत्यांच्या बैठका घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही गट विद्यमान खासदार राजेंद्र गावित हेच आपले उमेदवार असतील असेच सांगत आहेत. त्यामुळे जागा कुणाकडेही गेली तरी आपलीच उमेदवारी कायम असल्याने गावित प्रचाराला लागले आहेत. तसेच उमेदवार जाहीर झाला नसला तरी महायुतीकडून प्रचार सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा – Politics : भगवा आतंकवाद म्हणणाऱ्यांना…; गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देताना सातपुतेंचा प्रणिती शिंदेंवर निशाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -