Monday, April 29, 2024
घरमानिनीKitchenRecipe: हेल्दी लश ग्रीन पेस्टो असा करा तयार

Recipe: हेल्दी लश ग्रीन पेस्टो असा करा तयार

Subscribe

पदार्थाची चव वाढवण्यासाठी आपण विविध चटण्या घरी तयार करतो. मात्र सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे होलवीट सँन्डविच, रॅपर, बर्गर,पराठा या एक वेगळी चव देण्यासाठी काही प्रकारच्या स्प्रेड्सचा वापर केला जातो. तर आज आपण हेल्दी अशा लश ग्रीन पेस्टोची रेसिपी पाहणार आहोत. चला तर पाहूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

Stop Wasting Herbs! Let These Recipes Save the Day » Slow Living Kitchen

- Advertisement -

साहित्य-
लसणीच्या पाकळ्या 5 ते 6
आक्रोड
ऑलिव्ह ऑइल 1 चमचा
बेसिल लीव्स एक बाउल
आइस क्युब्स 3 ते 4

- Advertisement -

कृती
लश ग्रीन पेस्टो तयार करण्यासाठी आधी लसणीच्या पाकळ्या सोलून त्याचे तुकडे करा. आता मिस्कर मध्ये लसूण, आक्रोड, आणि एक चमचा ऑलिव ऑइल टाकून त्याची पेस्ट तयार करा.

त्यानंतर त्यात बेसिल लीव्स आणि आइस क्युब ही टाका. याच्या मदतीने पेस्ट स्मूद होईल. घट्ट राहणार नाही. पेस्ट तयार झाल्यानंतर त्यात लिंबूचा रस आणि काळी मिरी अॅड करा. तुम्ही हे स्प्रेड एक ग्लास बाउल किंवा बॉटलमध्ये स्टोर करू शकता.


हेही वाचा- Recipe: घरच्या घरी बनवा असा टोमॅटो सालसा

- Advertisment -

Manini