Eco friendly bappa Competition
घर लाईफस्टाईल फ्रीजच्या डोअरमधून आवाज येत असेल तर वापरा 'या' टिप्स

फ्रीजच्या डोअरमधून आवाज येत असेल तर वापरा ‘या’ टिप्स

Subscribe

आजकाल बहुतेक सगळेचजण हाय रेंज आणि मल्टीडोअर फ्रीज वापरतात. फ्रीज जेव्हा नवीन घेतो तेव्हा काही वर्षे तो छान व्यस्थित चालतो. पण कालांतराने जर का आपण पाहिलं तर फ्रीजचा डोअरमधून आवाज येऊ लागतो. आणि हा आवाज कशामुळे येतो हे आपल्याला समजत नाही. अशावेळी आपल्याला वाटते कि आपला फ्रीज हा खराब झाला असेल किंवा भरपूर दिवस आणि सतत वापरल्यामुळे हा आवाज येत असावा असे वाटते पण तस काहीच नसत.

तसेच फ्रीजच्या दरवाजातून आवाज येण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. रेफ्रिजरेटरचा दरवाजा लोखंडी गंजण्यापासून ते रबर सैल होण्यापर्यंतच्या विविध कारणांमुळे आवाज हा येत असतो. अशावेळी कोणत्या टिप्स वापरायला हव्यात त्या आपण जाणून घेऊया….

फ्रीजच्या दरवाजाचा आवाज ‘असा’ करा दुरुस्तWhat Causes a Refrigerator To Stop Cooling? | LHG

  • रेफ्रिजरेटरच्या दरवाजातील रबरमधील खराबीमुळे अनेकदा यातून आवाज येतो.
  • तसेच आपण नवीन फ्रीज जेव्हा विकत घेतो तेव्हा आपल्याला फ्रीजचा डोअर आणि त्यामधला रबर नेहमी साफ करण्याचा नेहमीच सल्ला दिला जातो.
  • महत्वाचे म्हणजे फ्रीजचा दरवाजा स्वच्छ ठेवल्याने तो व्यवस्थित बंद होण्यासही मदत होते.
  • रेफ्रिजरेटरच्या दरवाजाचे ग्रीस अनेकदा उघड बंद करून निघून जाते.
  • अशातच आपण हे न होण्यासाठी पेट्रोलियम जेली वापरू शकतो.
  • जेव्हा जेव्हा आवाज येत असेल तेव्हा त्या फ्रीजच्या दरवाजाला पेट्रोलियम जेली कापसावर घेऊन लावावी. आणि त्या दरवाज्यावर हळुवारपणे घासावी.
  • असे नियमित केल्याने फ्रीजच्या दरवाज्यामधून आवाज येणार नाही. आणि फ्रीज सुद्धा दीर्घकाळ टिकेल.
  • या सर्व गोष्टींव्यतिरिक्त ,ओल्या कपड्याने दरवाजा कधीही साफ करू नका.
  • जरी तुम्ही ओल्या कपड्याने दार साफ करत असाल तरी ते कोरड्या कपड्याने पुसून टाका.
  • या टिप्स जर तुम्ही वापरलात तर तुम्हाला याचा फायदा नक्की होऊ शकतो.
- Advertisement -

_________________________________________________________________________

हेही वाचा : चिकट झालेला चिमटा, झारा असा करा स्वच्छ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -