Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Kitchen Recipe : नाश्त्यासाठी बनवा मॅक्रॉनी उपमा

Recipe : नाश्त्यासाठी बनवा मॅक्रॉनी उपमा

Subscribe

लहान मुलांना दररोज डब्यासाठी काय द्यावे असा प्रश्न पालकांना पडतो. दररोज पोळी-भाजी दिल्यामुळे मुलं देखील कंटाळतात. अशावेळी काहीतरी छान आणि वेगळं दिल्यास मुलं ही खूश होतात आणि आवडीने खातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हा अशीच एक नवीन रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य :

 • 1 वाटी मॅक्रॉनी
 • 1/2 वाटी बारीक चिरलेला कांदा
 • 1 लहान टोमॅटो
 • 1 ते 2 हिरव्या मिरच्या
 • 1 चमचा तेल
 • 1/4 चमचा जिरे
 • 2 चिमूट हिंग
 • 4-5 कढीपत्ता पाने
 • चवीपुरते मीठ
 • बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती :

Indian tadka macaroni Recipe by Jayakrite Kande - Cookpad

 • सर्वप्रथम 3-4 वाट्या पाणी उकळण्यास ठेवावे. त्यात अर्धा चमचा मीठ घालावे. पाणी उकळले की त्यात मॅक्रॉनी घालाव्यात.
 • 8 ते 10 मिनिटे उकळवून मॅक्रॉनी शिजवाव्यात.
 • चाळणीत मॅक्रॉनी गाळून गरम पाणी निथळून मॅक्रॉनीवर गार पाणी घालून तेही पाणी निथळू द्यावे.
 • त्यानंतर कढईत तेल गरम करावे.
 • त्यात जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मिरची घालून फोडणी द्यावी.
 • आता त्यात कांदा घालावा आणि कांदा लालसर झाल्यावर त्यात टोमॅटो घालावा. टोमॅटो चांगला परतून घ्यावा.
 • आता त्यामध्ये मॅक्रॉनी घालून मिक्स करावे. त्यानंतर त्यात मीठ घालून 2 मिनिटे गरम करून कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करावे.

हेही वाचा :

Recipe : रव्याचे गोड ‘अप्पे’ नक्की ट्राय करा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini