घर क्रीडा भारताची ओळख लवकरच क्रीडा देश; नीरज चोप्राच्या सुवर्णकमाईनंतर गावस्करांचं मोठं वक्तव्य

भारताची ओळख लवकरच क्रीडा देश; नीरज चोप्राच्या सुवर्णकमाईनंतर गावस्करांचं मोठं वक्तव्य

Subscribe

नीरज चोप्राबद्दल ज्या पद्धतीनं लोक विचार करत आहेत. त्यामुळे मला वाटतं की, आपण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाबद्दल बोलतो की ते क्रीडा देश आहेत. तसंच मला वाटतं की कदाचित पुढच्या 10-15 वर्षांत भारताला देखील एक क्रीडा देश म्हणून ओळखलं जाईल, असं गावस्कर यावेळी म्हणाले.

जागतिक अॅथलेटिक्स अंजिक्य पद स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताला पहिले वहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. मागच्या स्पर्धेत त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. नीरज हा जागतिक अॅथेलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत दोन पदकं जिंकणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. नीरजच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच आता दिग्गज सुनील गावस्कर यांनी देखील नीरज चोप्राचं कौतुक केलं असून एक मोठं विधान केलं आहे. (India will soon be known as a sports country Sunil Gavaskar s big statement after Neeraj Chopra s gold)

सुनील गावस्कर म्हणाले की, नीरज चोप्राची ही कामगिरी पाहूल मला खूप आनंद झाला आणि खूप छान वाटलं. कारण इतर खेळांनीही चांगलं प्रदर्शन करणं महत्त्वाचं आहे. नीरजसाठी यावेळी सुवर्ण पदक मिळवणं महत्त्वाचं होतं आणि त्यानं भाला लांब फेकून ते करून दाखवलं. यामुळे इतरांना प्रेरणा मिळते. या चॅम्पियनशिपमध्ये नीरज व्यतिरिक्त इतर तीन भारतीय खेळाडून भालाफेकपटून अंतिम फेरीत होते हेही विसरून चालणार नाही. एक खेळाडू चांगली कामगिरी करतो तेव्हा त्या खेळाला आणखी प्रतिसाद मिळतो. अनेक जण त्या खेळाप्रती आकर्षित होत असतात, असं सुनील गावस्कर म्हणाले.

येत्या 10-15 वर्षांत भारत क्रीडा देश असेल

- Advertisement -

तसंच, नीरज चोप्राबद्दल ज्या पद्धतीनं लोक विचार करत आहेत. त्यामुळे मला वाटतं की, आपण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाबद्दल बोलतो की ते क्रीडा देश आहेत. तसंच मला वाटतं की कदाचित पुढच्या 10-15 वर्षांत भारताला देखील एक क्रीडा देश म्हणून ओळखलं जाईल, असं गावस्कर यावेळी म्हणाले.

महाराष्ट्राच्या अभिज्ञा पाटीलशी पंतप्रधानांची ‘मन की बात ‘

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज, रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमाचा काल, रविवारी 104वा भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी, नेमबाजीत भारताच्या विजयाचा झेंडा फडकावणारी महाराष्ट्राची अभिज्ञा पाटील हिच्याशी संवाद साधला. यावेळी अभिज्ञाने आपल्या संघर्षाची कहाणी सांगितली.

- Advertisement -

अभिज्ञाने आपली ओळख करून देताना सांगितले की, नेमबाजीत 25 मीटर पिस्तुल आणि 10 मीटर एअर पिस्तुल दोन्ही क्रीडाप्रकारात मी भाग घेत असते. माझे आईवडील शाळेत शिक्षक आहेत. मी 2015मध्ये नेमबाजीची सुरूवात केली आणि तेव्हा इतक्या सुविधा कोल्हापुरात मिळत नव्हत्या. बसने वडगावहून कोल्हापूरला जाण्यासाठी दीड तास लागत असे. दीड तास परत येण्यासाठी आणि सराव चार तासाचा. माझी शाळाही बुडत होती. नंतर ममी-पप्पा मला म्हणाले की, आम्ही तुला शनिवारी-रविवारी शूटिंगसाठी घेऊन जात जाऊ. उरलेल्या वेळात दुसरे खेळ करत जा. ममी-पप्पा यांना खेळात खूप रस होता. पण ते त्यावेळी काही करू शकले नाहीत. कारण आर्थिक पाठिंबाही त्यावेळी तितकासा नव्हता. शिवाय, तितकी माहितीही नव्हती, असे तिने सांगितले.

माझ्या आईचे स्वप्न होते की, मी देशाच प्रतिनिधित्व केले पाहिजे आणि देशासाठी पदकेही जिंकली पाहिजेत. म्हणूनच, मी त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लहानपणापासून खेळातही खूप रुची घेत असे. नंतर मी तायक्वांदो शिकले. मी ब्लॅकबेल्ट आहे. मुष्टीयुद्ध आणि ज्युडो, तलवारबाजी, थाळीफेक अशा खेळांतही भाग घेऊन 2015मध्ये नेमबाजी शिकले. दोन-तीन वर्षे मी खूप संघर्ष केला आणि मलेशियात माझी निवड झाली; मला तिथे कांस्य पदक मिळाले. तिथून मला खूप प्रोत्साहन मिळाले. माझ्या शाळेने माझ्यासाठी एक शूटिंग रेंज बनवली. नंतर शाळेने मला प्रशिक्षणासाठी पुण्याला पाठवले. मी आता गगन नारंग प्रतिष्ठानमध्ये आहे. गगन सरांनी मला चांगला पाठिंबा दिला असल्याचे ती म्हणाली.

(हेही वाचा: Neeraj Chopra : अर्शद नदीम आणि नीरज चोप्राचे ‘असे’ही ऑलिम्पिक कनेक्शन, त्यावेळी घडले होते…)

- Advertisment -