घरमहाराष्ट्रChild Marriage Prevention Act : बीड जिल्हा बनतोय बालविवाहाचा हॉटस्पॉट; वर्षभरात 160...

Child Marriage Prevention Act : बीड जिल्हा बनतोय बालविवाहाचा हॉटस्पॉट; वर्षभरात 160 थांबविले

Subscribe

बीड जिल्ह्यामध्ये बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन चांगलेच सरसावले आहे. बीडमध्ये सर्व शाळांमध्ये प्रत्येक सोमवारी बालविवाह थांबविण्याची प्रतिज्ञा दिली जाते.

बीड : मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद विभागातील बीडमधून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे बीड जिल्ह्यातील मागील वर्षभरात तब्बल 160 बालविवाह होता-होता प्रशासनाने थांबविले असून, 21 प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या 160 प्रकरणे जरी समोर आली असली तरी यापेक्षाही अधिक प्रमाणात बालविवाह होत तर नाहीत ना असाही प्रश्न यानिमीत्ताने समोर येत आहे.(Child Marriage Prevention Act : Beed district is becoming a hotspot for child marriage; 160 stopped during the year)

बीड जिल्ह्यामध्ये बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन चांगलेच सरसावले आहे. बीडमध्ये सर्व शाळांमध्ये प्रत्येक सोमवारी बालविवाह थांबविण्याची प्रतिज्ञा दिली जाते. यावर्षी आतापर्यंत 160 बाल विवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले असून, 21 प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या माहितीनंतर याच विषयाला घेऊन महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्यासोबत मुंबईत बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी बीडमधील बालविवाह रोखण्याचे आदेश निर्गमीत केले होते.

- Advertisement -

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले बालविवाहामागील कारण

बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे म्हणाल्या की, बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या स्थलांतरामुळे बालविवाह होतात. अनेक ठिकाणी शाळा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना दूरवर जावे लागते. मुलींसाठी बसची व्यवस्था केल्यास बालविवाहाचे प्रमाण आणखी कमी होईल. बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन आता या बैठकीच्या माध्यमातून विविध योजना सुरू करत आहे. बालविवाहाची सर्वाधिक प्रकरणे ऊसतोड मजुरांच्या मुलांमध्ये दिसतात. अनेक भागात लोक बालविवाह करतात कारण इयत्ता 7 वी आणि 10 वी नंतर शिक्षणासाठी पुरेशी महाविद्यालये नाहीत. हे थांबवण्यासाठी आता अनेक जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत. यासाठी शाळांमधील विद्यार्थ्यांना 1098 वर कॉल करून बालविवाहासंबंधी माहिती देण्यास सांगण्यात आले असून त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा : चंद्रावर चालता-चालता रोव्हरच्या वाटेत आला खड्डा; वाट बदलून ‘प्रज्ञान’ पुन्हा ध्येयाच्या दिशेने

- Advertisement -

बालविवाहाबाबत माहिती देण्याची संख्या वाढतेय

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात होत असलेल्या बालविवाहाची माहिती प्रशासनाला देण्यात आता वाढ होत आहे. त्यामध्ये एप्रिल 2016 ते मार्च 2017 पर्यंत 19 प्रकरणाची माहिती मिळाली, 2017 ते 2018 मध्ये 27, 2018 ते 2019 17, 2019 ते 2020 मध्ये 39, 2020 ते 2021 मध्ये 41, 2021 ते 2022 मध्ये 83, 2022 ते 2023 मध्ये 132 तर 2023 च्या 26 ऑगस्टपर्यंत 149 प्रकरणाची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर भावना गवळी म्हणाल्या; “ठाकरेंनी फडणवीसांबरोबर…”

बालविवाहाची माहिती द्या, बक्षिस मिळवा

बीड जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी विविधांगी प्रयोग राबविले जात आहेत. यामध्ये आता आगामी काळात विविध ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह रोखण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनाकडून अनेक बक्षिसे दिली जात आहेत, विविध ग्रामपंचायती आणि शाळा-महाविद्यालये यांच्यातील स्पर्धा दहावीच्या वरच्या वर्गात घेण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -