घरताज्या घडामोडीMVA LIVE : महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला! सांगली ठाकरे तर...

MVA LIVE : महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला! सांगली ठाकरे तर भिवंडी शरद पवारांकडेच

Subscribe

मुंबई – महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक शिवसेना ठाकरे गटाच्या नरिमन पाँईट येथील शिवालय कार्यालयात झाली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा आज सुटला. महाविकास आघाडीतील प्रमुख तिन्ही पक्षांनी त्यांचे बहुतेक उमेदवार जाहीर केलेल आहेत. सांगली आणि भिवंडीच्या जागेवरुन आघाडीतील काही नेते एकमेकेंवार आरोप-प्रत्यारोप करत होते. तो तिढाही आज सोडवण्यात आला. सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गट तर भिवंडी राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. या दोन्ही जागांवर काँग्रेसने दावा सांगितला होता. (Lok Sabha Election 2024 Maha Vikas Aghadi Seat Sharing Meeting)

कोणाविरुद्ध आणि कशासाठी लढत आहोत ते स्पष्ट – उद्धव ठाकरे

आपण कोणाविरुद्ध आणि कशासाठी लढत आहोत, हे मोठे उद्दिष्ट समोर ठेवून लढायचे असते, असे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सांगलीची जागा शिवसेनेचे चंद्रहार पाटीलच लढणार असल्याचे आता स्पष्ट झाले. तर भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटच लढणार असल्याचेही आजच्या जागा वाटपात स्पष्ट झाले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, युतीमध्ये जागा वाटपात सर्व पक्ष आनंदीत आहेत. कोणीही नाराज होण्याचा प्रश्न नाही, कारण आम्ही कोणाविरुद्ध आणि कशासाठी लढत आहोत ते उद्दिष्ट आमचे स्पष्ट आहे.

- Advertisement -

बैठकीला आप-डावे नेतेही उपस्थित 

शिवालय येथील बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकेर, संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, आम आदमी पार्टीचे नेते, आमदार कपील पाटील या बैठकीला उपस्थित आहेत. थोड्याच वेळात महाविकास आघाडीच्या प्रमुख तिन्ही पक्षांच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.

 Mahavikas Aghadi Seat Shareaing Meeting
महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद

महाविकास आघाडीचा राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. संजय राऊत यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. शिवसेना ठाकरे गट – 21, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – 10 जागांवर लढणार असल्याचे जाहीर केले. महाविकास आघाडीतून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी बाहेर पडले आहेत. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हेच प्रमुख तीन पक्ष या आघाडीत असण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Thackeray Vs Modi : सूर्यग्रहण, अमावास्या आणि मोदींची सभा,असा वाईट योग बऱ्याच दिवसांनंतर देशाने पाहिला – उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीतील प्रमुख तिन्ही पक्षांनी बहुतेक उमेदवारांची घोषणा केली आहे. सांगली, भिवंडी आणि मुंबई दक्षिण मध्य या तीन जागांवरुनच सध्या तिढा आहे.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी राज्यात 35 पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा दावा आज सकाळीच केला आहे.

हेही वाचा : Sanjay Raut : राज्यातील राजकारणात साडेतीन शहाणे, संजय राऊतांचा कोणावर निशाणा?

शिवसेना ठाकरे गट – 21

1) जळगाव
2) परभणी
3) नाशिक
4) पालघर
5) कल्याण
6) ठाणे
7) रायगड
8) मावळ
9) धाराशिव
10) रत्नागिरी
11) बुलढाणा
12) हातकणगंले
13) छत्रपती संभाजीनगर
14) सांगली
15) हिंगोली
16) यवतमाळ-वाशिम
17) मुंबई उत्तर पश्चिम
18) मुंबई उत्तर पूर्व
19) मुंबई दक्षिण मध्य
20) मुंबई दक्षिण
21) ईशान्य मुंबई

काँग्रेस : 17 जागा

1) नंदुरबार
2) धुळे
3) अकोला
4) अमरावती
5) नागपूर
6) भंडारा
7) गडचिरोली
8) चंद्रपूर
9) नांदेड
10) जालना
11) मुंबई उत्तर मध्य
12) पुणे
13) लातूर
14) सोलापूर
15) कोल्हापूर
16) रामटेक
17) उत्तर मुंबई

शरद पवारांची राष्ट्रवादी 10

1) बारामती
2) शिरूर
3) सातारा
4) भिवंडी
5) दिंडोरी
6) माढा
7) रावेर
8) वर्धा
9) नगर दक्षिण
10) बीड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -