Monday, April 29, 2024
घरमानिनीKitchenRecipe : नाश्त्यासाठी बनवा कोळंबीचे टेस्टी पोहे

Recipe : नाश्त्यासाठी बनवा कोळंबीचे टेस्टी पोहे

Subscribe

आत्तापर्यंत तुम्ही कोळंबी फ्राय, मसाला कोळंबी, कोळंबी राईस, कोळंबी भजी यांसारखे कोळंबीपासून तयार केलेले अनेक पदार्थ खाल्ले असतील. आज आम्ही तुम्हाला कोळंबीचे पोहे कसे करायचे हे सांगणार आहेत.

साहित्य :

  • 1 वाटी सोललेली कोळंबी
  • 3-4 वाट्या जाड पोहे
  • 2 कांदे बारीक चिरलेले
  • 4-5 हिरव्या मिरच्या
  • कढीपत्ता
  • कोथिंबीर
  • लाल तिखट
  • हळद
  • जीरे
  • मोहरी
  • मीठ चवीनुसार
  • तेल

 

- Advertisement -

कृती :

Prawns (kolambi) poha – Nutritionist Avaanti Deshpaande

  • सर्वप्रथम कोळंबीला हळद, लाल तिखट, मीठ लावून ठेवा. आणि पोहे भिजवून घ्या.
  • आता गॅसवर कढई गरम करुन त्यात तेल टाका.
  • तेल तापल्यानंतर जीरे, मोहरी घालावा.
  • लगेच त्यात कांदा, मिरची, कढीपत्ता, हळद घालावी.
  • नंतर त्यात कोळंबी घालून सर्व मिश्रण परतून घ्यावे.
  • थोडा वेळ झाकण ठेवून कोळंबी छान शिजू द्यावी.
  • कोळंबी शिजल्यानंतर त्यात पोहे घालून चांगले परतून घ्या.
  • आता चवीनुसार मीठ घाला.
  • तयार गरमागरम पोह्यांवर कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

हेही वाचा :

Thirty First Special : पार्टी स्टार्टर अंडाभजी

- Advertisment -

Manini