घरठाणेCM Eknath Shinde : राजकीय अधिष्ठानापेक्षा अध्यात्मिक अधिष्ठान महत्त्वाचं- CM एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde : राजकीय अधिष्ठानापेक्षा अध्यात्मिक अधिष्ठान महत्त्वाचं- CM एकनाथ शिंदे

Subscribe

पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संतांनी केलेल्या प्रबोधनामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचं तारतम्य महाराष्ट्र नेहमीच बाळगत आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय की, आपल्या महाराष्ट्रामध्ये तरुण वर्गाचा डोळस सहभाग, आशादायी वाटतो. देश आणि धर्म जपणारी पिढी आपण तयार करत आहोत. याची खात्री या प्रतिसादातून मिळत आहे.

ठाणे : आम्ही जरी समाजकारण, राजकारण करत असलो, कोणी आमदार, कोणी खासदार, कोणी मंत्री, कोणी मुख्यमंत्री असले तरीसुद्धा राजकीय अधिष्ठानापेक्षा अध्यात्मिक अधिष्ठान जे आहे ते सर्वांत वर आहे. ही भावना आमच्या मनामध्ये आहे. कारण संत महात्म्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रेरणेने आपल्यासारखे लहान-लहान कार्यकर्ते देशासाठी, राज्यासाठी काही ना काही आपण देणं लागतो या भावनेने आपण काम करत असतो. मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काही देणार आहे. मी माझ्या देशाला काय देणार आहे हा विचार प्रत्येकाने मनामध्ये आपण ठेवला पाहिजे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते आज (2 जानेवारी) मलंगगड येथे आयोजित राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. (CM Eknath Shinde Spiritual institution is more important than political institution CM Eknath Shinde)

पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संतांनी केलेल्या प्रबोधनामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचं तारतम्य महाराष्ट्र नेहमीच बाळगत आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय की, आपल्या महाराष्ट्रामध्ये तरुण वर्गाचा डोळस सहभाग, आशादायी वाटतो. देश आणि धर्म जपणारी पिढी आपण तयार करत आहोत. याची खात्री या प्रतिसादातून मिळत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे 22 जानेवारीला इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद व्हावी अशी घटना घडत आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाचं मंदिर उभारलं जातेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी या लाखो करोडो रामभक्तांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा आणि त्याचबरोबर आपल्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांचं स्वप्न 22 जानेवारीला पूर्ण करताय. म्हणून या ऐतिहासिक महापर्वाचे आपण सगळे साक्षीदार असणार आहोत. या सोहळ्यानिमित्त राज्यभरामध्ये देखील जणू राम नामाची दिवाळी साजरी होतेय. आणि सगळीकडे दिवाळी साजरी देशभरात होणार आहे. अतिशय मोठा भव्यदिव्य सोहळा अयोध्येत होतो आहे. आणि म्हणून प्रत्येक भारतीयांच्या मनात विराजमान असणारा भगवा भगवान श्रीराम हक्काच्या मंदिरात विराजमान होणार आहे. या घटनेचं स्वागत आपण सर्वांनी उस्फुर्त केलेलं आहे. आणि म्हणून ज्याप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक हिंदूंच्या हृदयातील इच्छा पूर्ण करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Truck Drivers Protest : पुढील 10 दिवस ST ला पुरेल एवढा इंधनसाठा ‘या’ आगारामध्ये उपलब्ध

पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तुमच्या मनातलं सरकार दीड वर्षापूर्वी स्थापन झालं. सर्व सामान्यांच्या मनातलं सरकार स्थापन झाल्यानंतर आपण सगळ्या सणांवरच्या बंदी दूर केल्या. सणांवरील निर्बंध हटवले. निर्बंध मुक्त वातावरणात आपले सण साजरे होऊ लागले आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील पुरातन मंदिरांचं देखील संवर्धन करतोय, तीर्थक्षेत्रांचा विकास करतोय. जे-जे काही आपल्याला करता येईल ते ते आपण करण्याचा प्रयत्न सरकार करतंय असून, म्हणूनच अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी 138 कोटी रुपये दिलेले आहेत असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Hit And Run New Law: नवीन ‘हिट अँड रन’ कायदा आहे तरी काय? ज्याच्यामुळे देशभरातील वाहन चालक झालेत आक्रमक

शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात कीर्तन, प्रवचनाची गरज

पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कीर्तनकारांचे विचार नेहमीच दिशा देतात. त्यांचे चांगले वाईट विचारांना दूर लोटतात. मी अधिवेशनातही सांगितलं होतं की, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करणार, त्याचं पुर्नगठनही करण्यात येत आहे. त्यामुळे माझी सर्व कीर्तनकारांना विनंती आहे की, ज्या- ज्या भागामध्ये आत्महत्या होतायेत, त्या- त्या भागात देखील आपली कीर्तनं, आपली प्रवचन, अखंड हरिनाम सप्ताह झाले पाहिजेत आणि त्याठिकाणी देखील त्यांच्या मनात परिवर्तन आणलं पाहिजे. त्यासाठी शासन म्हणून जे जे काही आहे ती आम्ही घ्यायला तयार आहोत. एक जरी आत्महत्या आपण करू, कमी करू शकलो, तरीसुद्धा सार्थक आहे. असेही प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -