Tuesday, April 30, 2024
घरमानिनीKitchenRecipe : टेस्टी फोडणीचा पाव

Recipe : टेस्टी फोडणीचा पाव

Subscribe

बऱ्याचदा ब्रेड किंवा पाव घरात शिल्लक असतो. अशावेळी त्यापासून तुम्ही त्यापासून एक चविष्ट पदार्थ बनवू शकता.

साहित्य :

  • ब्रेड किंवा पाव
  • तेल
  • कांदा
  • चवीनुसार मीठ
  • मिरची
  • जिरे
  • मोहरी
  • हिंग
  • हळद
  • कोथिंबीर

कृती :

Spicy And Tangy Bread Upma Recipe

- Advertisement -
  • सर्वप्रथम ब्रेड किंवा पाव व्यवस्थित कुस्करून घ्या. त्यानंतर त्यावर तुमच्या अंदाजानुसार मीठ घाला.
  • एका कढईत तेल ओता. त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद, चिरलेला कांदा आणि मिरच्यांचे तुकडे घालून व्यवस्थित परतून घ्या.
  • कांदा शिजत आल्यावर वरून ब्रेड किंवा पावाचा चुरा घाला आणि व्यवस्थित मिक्स करा.
  • नंतर वरुन चिरलेली कोथिंबीर घाला आणि एक वाफ काढून गरमागरम फोडणीचा पाव सॉसबरोबर सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : शिळ्या पोळीपासून बनवा टेस्टी मसाला पोळी

- Advertisment -

Manini