घरक्रीडाIPL 2024: हार्दिक प्रेक्षकांकडून ट्रोल, कोहलीने असं काही केलं की मैदानावरील चित्रच...

IPL 2024: हार्दिक प्रेक्षकांकडून ट्रोल, कोहलीने असं काही केलं की मैदानावरील चित्रच बदललं

Subscribe

हार्दिकला प्रेक्षक चिडवताना कोहलीने एका गोष्टीने जिंकली सर्वांची मनं

मुंबई: हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यापासून त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच, वानखेडे आणि नरेंद्र मोदी स्टेडियमवर चाहत्यांनी रोहित…रोहितचे नारे लावून हार्दिकला खूप डिवचलं. असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले, जेव्हा हार्दिक पंड्या गुरुवारी आरसीबीविरुद्ध फलंदाजीसाठी उतरला. तेव्हा चाहत्यांनी त्याला चिडवण्याचा प्रयत्न केला, मात्र विराट कोहलीच्या विनंतीमुळे प्रेक्षक शांत झाले आणि क्षणात मैदानावरील चित्र बदललं. (MI Vs RCB IPL 2024 Trolled by fans Virat Kohli indicate audience to stop hooting Hardik Pandya)

हार्दिक, हार्दिक… …

विराट कोहलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो चाहत्यांना हार्दिकला ट्रोल न करण्याची विनंती करताना दिसत आहे. कोहलीने हार्दिक पांड्याला चिडवू नका अशी विनंती प्रेक्षकांना केली. रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर पांड्या बॅटिंगला आला तेव्हा हा प्रकार घडला. किंग कोहलीच्या या विनंतीचा परिणाम असा झाला की, चाहत्यांनी लगेचच पाठ फिरवली आणि स्टेडियममध्ये हार्दिक…हार्दिक…चे हे नावं गुंजू लागलं.

- Advertisement -

रोहित शर्मानेही केली विनंती

विराट कोहलीने केलेली विनंती प्रेक्षकांना खूप आवडली. ते विरोट कोहलीचं कौतुक करतानाही दिसले. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने म्हटलंय की, किंग कोहलीने खिलाडूवृत्तीची भावना टिकवून ठेवण्याचे मोठे काम केले आहे. याआधी माजी कर्णधार रोहित शर्मा स्वतः राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात चाहत्यांना शांत करताना दिसला होता. त्याने चाहत्यांना बडबड थांबवण्यास सांगितले होते.

- Advertisement -

आकाश अंबानीसोबत रोहित!

मागच्या दोन सामन्यांपासून हार्दिक पांड्याने स्फोटक फलंदाजी केली. पांड्याने 6 चेंडूत 3 षटकार ठोकले, नाबाद 21 धावा केल्या आणि 27 चेंडू शिल्लक असताना सामना संपवला. मुंबई इंडियन्सने हा सामना 7 विकेट्सने जिंकला. दरम्यान, रोहितचा एक व्हिडिओही चर्चेचा विषय बनला आहे, ज्यामध्ये तो आकाश अंबानीसोबत दिसत आहे. यानंतर पुन्हा एकदा सट्टाबाजार चांगलाच तापला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -