घरक्रीडाMumbai Indians Match : IPLवर मुंबईचा दबदबा कायम; एकाही संघाला न जमलेला...

Mumbai Indians Match : IPLवर मुंबईचा दबदबा कायम; एकाही संघाला न जमलेला विक्रम नावावर

Subscribe

इंडियन प्रीमिअर लागच्या (IPL 2024) 17 व्या पर्वात मुंबई इंडियन्सने सलग दुसरा विजय मिळवला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सात गडी राखून पराभव केला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथन गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मुंबईच्या गोलंदाजांनी बंगळुरूच्या फलंदाजांसमोर आक्रमक गोलंदाजी केली.

मुंबई : इंडियन प्रीमिअर लागच्या (IPL 2024) 17 व्या पर्वात मुंबई इंडियन्सने सलग दुसरा विजय मिळवला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सात गडी राखून पराभव केला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथन गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मुंबईच्या गोलंदाजांनी बंगळुरूच्या फलंदाजांसमोर आक्रमक गोलंदाजी केली. तसेच, बंगळुरूने दिलेल्या 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या सलामीवीरांपासून सर्वच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. अखेर 15.3 षचकांत मुंबईने हा सामना जिंकला. (Mumbai Indians Match Mumbai beat RCB In IPL 2024 MI vs RCB News)

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईने 16 व्या षटकात सामना जिंकला. विशेष म्हणजे चार षटक शिल्लक ठेवत मुंबईने हा सामना जिंकला असला तरी याबाबतचा विक्रम मुंबईच्या नावावर कायम आहे. कारण मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या (IPL 2024) इतिहासात आतापर्यंत 4 वेळा 17 षटकांत 190 किंवा त्याहून अधिक धावांचे लक्ष्य गाठले आहे. गतवर्षी देखील वानखेडे मैदानावर बंगळरूविरुद्ध मुंबईने 16.3 षटकांत 200 धावांचे लक्ष्य गाठले होते. त्याआधी 2017 मध्ये पंजाबविरुद्ध मुंबईने 15.3 षटकांत 199 धावा केल्या होत्या. तसेच, 2014 मध्ये मुंबईने राजस्थानविरुद्धचा सामना 14.4 षटकांत 190 धावा करून जिंकला होता.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2024 Points Table: मुंबई इंडियन्सचा पॉइंट टेबलमध्ये धमाका; RCB अडचणीत

विशेष म्हणजे आयपीएलच्या इतिहासात आतपर्यंत कोणत्याच संघाला हा विक्रम करता आलेला नाही. आयपीएलमध्ये 14 संघ खेळले. मात्र आता केवळ 10 संघ आयपीएलची स्पर्धा खेळत आहे. या 10 संघापैकी एकाही संघाला कमी षटकांत धावसंख्या गाठता आली नाही. दिल्लीने गुजरात लायन्ससमोर 17.3 षटकांत 209 धावांचे लक्ष्य गाठले. तर राजस्थान रॉयल्सने 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 190 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी 17.3 षटके घेतली.

- Advertisement -

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. गोलंदाजी करताना मुंबईच्या गोलंदाजांनी बंगळुरूच्या फलंदाजांचा चांगला समाचार घेतला. या सामन्यात बुमराहने पाचव्यांदा विराट कोहली यादा बाद केले. विराट केवळ तीन धावांवर बाद झाला. मात्र कर्णधार फाफ डु प्लेसीस, रजत पाटीदार आणि दिनेश कार्तिक यांनी अर्धशतकी खेळी करत बंगळुरूची धावसंख्या 196 वर नेली. तसेच, 197 धावांचे आव्हान मुंबईसमोर ठेवले.

या सामन्यात गोलंदाजी करताना मुंबईच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. बुमराहने चार षटकांत 21 धावा देत पाच गडी बाद केले. तसेच, जेराल्ड कोएत्झी, आकाश मधवाल आणि श्रेयश गोपाल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजी करताना मुंबईच्या फलंदाजी आक्रमक खेळी केली. सालमीवीर रोहित शर्मासह ईशान किशान यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. सलामीवीर ईशान किशन याने 34 चेंडूत पाच षटकार, सात चौकार मारत 69 धावा केल्या. तसेच, रोहित शर्मा याने 24 चेंडूत 38 धावा केल्या. त्याचप्रमाणे सूर्यकुमार यादव याने 19 चेंडूत 52 धावा केल्या.


हेही वाचा – IPL 2024: हार्दिक प्रेक्षकांकडून ट्रोल, कोहलीने असं काही केलं की मैदानावरील चित्रच बदललं

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -