घरमहाराष्ट्रमुंबईतील रखडलेल्या विकासकामांवर ठेवले आदित्य ठाकरेंनी बोट; पालिका आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांना घेरले

मुंबईतील रखडलेल्या विकासकामांवर ठेवले आदित्य ठाकरेंनी बोट; पालिका आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांना घेरले

Subscribe

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईतील रस्त्यांची कामे कधी होणार? मार्च आणि आता पुन्हा नवी डेडलाइन दिली आहे.

मुंबई : ठाकरे गटातील आमदार आदित्य ठाकरे यांनी शनिवारी (28 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील रखडलेल्या कामांवर बोट ठेवत महापालिका आयुक्तांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरले. यावेळी त्यांनी एक नव्हे अनेक प्रश्न उपस्थित केले. (Aditya Thackeray pointed at the stalled development works in Mumbai Municipal Commissioners and Chief Ministers were surrounded)

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईतील रस्त्यांची कामे कधी होणार? मार्च आणि आता पुन्हा नवी डेडलाइन दिली आहे. एकाबाजूला बिल्डर, कंत्राटदारांचे सरकार आहेत त्यांचे लाड पुरवत आहे. शहरातील बांधकामामुळे धुळीचे प्रदूषण वाढले आहे. असे असताना त्यावर काही उपाय करत आहात का? अजून 15 वार्डात वार्ड ऑफिसर नाही. बदल्यांसाठी खोके मागितले जात असल्याचा आरोप यावेळी आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा : दिवाळी आधी बेरोजगारांना सुखद धक्का; 51 हजार तरुणांना पंतप्रधांनाकडून नोकरीची भेट

साडेआठ हजार कोटींचे कामे रखडली

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, सध्या ऑक्टोबर महिना संपत आहे. पुढील नोव्हेंबर महिना येत असतानाही अद्यापही साडे आठहजार कोटींची रस्त्यांची कामे खोळंबली आहेत. डेडलाइन न पाळणाऱ्यांवर कारवाई केली का? हे घाणेरडे राजकारण राज्यात सुरू असल्याची टीका करत आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.

- Advertisement -

हेही वाचा : मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस…; ‘त्या’ व्हिडीओ प्रकरणी बावनकुळेंची सारवासारव

आम्ही सत्तेत आल्यावर यांना जेलमध्ये टाकू

आमचे सरकार राज्यात आल्यानंतर या सरकारमधून ज्यांनी ज्यांनी घोटाळे केले त्यांना जेलमध्ये टाकणारच. राज्यात प्रदूषित राजकारण करून ठेवल आहे. ते सुधारण्यासाठी आम्ही पुढे आलो असून, खड्डेमुक्त रस्ते देऊ अशी घोषणा करणाऱ्यांनीच रस्त्यांची कामे का खोळंबली याचा खुलासा करावा. एमएसआरडीसी असो वा बीएमसी सगळीकडे गोंधळ सुरू आहे. बुलेट ट्रेन येण्याआधीच अनेक उद्योग गुजरातला गेले असल्याचा आरोपसुद्धा यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला. तर सध्या कंत्राटदारांची नावे घेतली नाहीत. ज्यांना काम दिले जाते ते काम करतात. सगळीकडे खोक्यांचा कारभार आहे. कागदपत्रे तयार आहेत पण रस्ते बांधकाम दिसत नाही. या रस्ते घोटाळ्यात जे कुणी दोषी असतील मंत्री असो, अधिकारी असो सगळ्यांवर कारवाई आम्ही करणार असल्याचा इशारा यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिला.

कारवाई खोके घेऊन थांबवली जाणार का?

मागील 10 ते 12 महिने आम्ही रस्त्यांचा विषय मांडतोय. ज्या शहरांमध्ये प्रशासक आहेत तिथे घोटाळे सुरु आहेत. मुंबईत 5 कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांपैकी एका कॉन्ट्रॅक्टरला टर्मीनेशन नोटीस गेली. या नोटीशीला कंत्राटदारानं उत्तर दिलं. त्याची सुनावणी महापालिकेत या आठवड्यात होणार आहे. या सुनावणीनंतर कंत्राटदारावर कारवाई होते की खोके घेऊन कारवाई थांबवली जाते हे आम्हाला बघायचंय. मुंबईत रस्त्याची कामे 1 ऑक्टोबर ते 31 मे पर्यंत पूर्ण होतात. मुंबईत एकाही रस्ते कामाला सुरुवात नाही. अडीच हजार कोटींची कामे तशीच्या तशी पडून आहेत. ट्राफिक पोलिसांच्या एनओसी न मिळाल्याचे दाखवून रस्ता कामे रखडवली जातायेत. मोठा गाजावाजा करुन सहा हजार कोटीच्या कामांची घोषणा केली, नारळ फोडला पण ती कामेही पडूनच आहेत असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्त आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -