Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Relationship पार्टनरच्या पेरेंट्ससोबत नातेसंबंध घट्ट करण्यासाठी 'या' टीप्स येतील कामी

पार्टनरच्या पेरेंट्ससोबत नातेसंबंध घट्ट करण्यासाठी ‘या’ टीप्स येतील कामी

Subscribe

जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर पार्टनरच्या पेरेंट्सोबत ही उत्तम नातेसंबंध असावेत असे प्रत्येकालाच वाटते. सुरुवातीला असे करण्यासाठी भीती वाटेल. पण ते नक्की करा. तरुण मुलगा असो किंव मुलगी पार्टनरला इंम्प्रेस करावेच लागते. परंतु खुप वेळा असे होते की, पार्टनरच्या पॅरेंट्समुळे नाते घट्ट होत नाही. अशातच आपल्याकडून त्यांना हॅप्पी फिल करुन देण्यासाठी काही ना काहीतरी केले जाऊ शकते. त्यांना तुमचे सुद्धा महत्व आहे हे पटवून देणे फार महत्वाचे असते. जर तुमच्या पार्टनरच्या पेरेंट्सचे आणि तुमचे नाते अधिक घट्ट झाले तर समजून जा तुम्ही पार्टनरसोबत खुप आनंदीत राहू शकता. पण नक्की हे करायचे कसे? याच बद्दलच्या टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.(Relationship with partner parents)

डिनरसाठी बोलवा
पार्टनरच्या पेरेंट्सोबत कधीतरी डिनरला जा. या निमित्ताने तुम्ही एकत्रित वेळ घालवू शकता. नाते अधिक घट्ट करण्यासाठी हा पर्याय नक्कीच तुमच्या कामी येईल. डिनरच्या वेळी ते काय बोलतायत हे ऐका आणि तुमचे मतं ही द्यायला विसरु नका.

- Advertisement -

प्रत्येक यशाबद्दल सांगा
पार्टनरच्या पालकांना जेवढे महत्वा देता येईल तेवढे द्या. त्यामुळे त्यांच्या नजरेत तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल. त्याचसोबत आपल्या प्रत्येक यशाबद्दल पार्टनरच्या पालकांना जरुर सांगा. अशाने तुमच्यामधील नाते अधिक घट्ट होऊ शकते.

- Advertisement -

बोलण्यातून मनं जिंका
तुमचे बोलण्याने ते इंप्रेस होत असतील तर ते नक्की करा. पार्टनरचे पालक जेव्हा तुमच्याशी बोलत असतील तेव्हा अशा भाषेचा वापर करा ज्यामध्ये तुमचा आवाज अधिक स्पष्ट असेल. वादग्रस्त भाषेचा वापर करण्यापासून दूर रहा.

प्रेमाने मनं जिंका
पार्टनरच्या पालकांना जेव्हा भेटाल तेव्हा त्यांच्याशी हसा. यामुळे तुमच्याबद्दलची सकारात्मकेची छाप त्यांच्यावर पडेल. नाते घट्ट करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला असे करावेच लागेल. त्यांच्या पालकांना सुद्धा तुम्ही असे केलेले आवडेल.


हेही वाचा- Live in मध्ये राहण्याआधी जाणून घ्या तुमचे अधिकार

- Advertisment -

Manini