Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी MyMahanagar पत्रकार धमकी : जाणीवपूर्वक घडलं असेल तर... शुंभराज देसाईंची प्रतिक्रिया

MyMahanagar पत्रकार धमकी : जाणीवपूर्वक घडलं असेल तर… शुंभराज देसाईंची प्रतिक्रिया

Subscribe

‘My Mahanagar’चे पत्रकार स्वप्निल जाधव (Swapnil Jadhav) यांना सोमवारी वांद्रे पूर्व येथील काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddiqui) यांनी ‘हात तोडून हातात देईन’ अशा प्रकारची धमकी दिली होती. धमकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई क्राइम रिपोटर्स असोसिएशनसह मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ तसेच मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाने जाहीर निषेध केला आहे. तसेच शिंदे गटाचे नेते आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. जाणीवपूर्वक जर असं काही घडलं असेल आणि संबंधित प्रतिनिधींनी तक्रार केली असेल तर त्यावर चौकशी करून निश्चितपणे कारवाई करू, अशा इशारा शुंभराज देसाईंनी दिला आहे.

दम देण्याचा प्रकार घडला असेल तर…

शंभुराज देसाई यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, माध्यमांच्या कुठल्याही प्रतिनिधीला धक्काबुक्की किंवा दमदाटी झाली असेल. त्याचप्रमाणे दम देण्याचा प्रकार जर घडला असेल तर, तशी संबंधित तक्रार प्रतिनिधींनी पोलिसांना द्यावी. पोलीस सर्व प्रकारच्या बाबी तपासून घेतील. माध्यमांच्या व्यक्तींना दमदाटी करणारा कुणीही व्यक्ती असो, मग ती पदाधिकारी, लोकप्रतिनिधी किंवा कुणीही असो त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करु, असा इशारा शंभुराज देसाई यांनी दिला आहे.

निश्चितपणे कारवाई करू

- Advertisement -

शेवटी माध्यमांचे प्रतिनिधी हे वृत्त संकलन करण्यासाठी आणि ही माहिती सामान्य जनतेपर्यंत लवकरात लवकर पोहोचावी म्हणून ते काम करत असतात. अनावधानानं घडलं असेल तर आम्ही समजू शकतो, पण जाणीवपूर्वक जर असं काही घडलं असेल आणि संबंधित प्रतिनिधींनी तक्रार केली असेल तर त्यावर चौकशी करून निश्चितपणे कारवाई करू, असं शंभुराज देसाई म्हणाले.

आमदार सिद्दिकी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

- Advertisement -

My Mahanagarचे पत्रकार स्वप्निल जाधव यांना काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी हात तोडण्याच्या दिलेल्या धमकीचा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने तीव्र निषेध केला आहे. आमदार झिशान सिद्दीकी यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी वार्ताहर संघाने केली आहे. या मागणीसाठी संघाच्या वतीने आज, मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कारवाईसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. शिवाय, झिशान सिद्दीकी यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्याची मागणी संघ प्रतिनिधी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन करणार आहेत, असे संघटनेचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि कार्यवाह प्रवीण पुरो यांनी सांगितले.

तसेच टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनने (महाराष्ट्र) देखील या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत आमदार झिशान सिद्दीकी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. आमदार सिद्दीकी यांनी माफी मागवी अन्यथा पत्रकार संघटना आक्रमक भूमिका घेतील, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष विनोद जगदाळे आणि सचिव राजेश माळकर यांनी दिला आहे.

सिद्दीकी यांनी तत्काळ माफी मागावी

लोकप्रतिनिधी असूनही आमदार सिद्दीकी यांचे हे वागणे अशोभनीय असल्याचे सांगत, मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाने पत्रकाराला धमकी देण्याच्या सिद्दीकी यांच्या कृतीचा जाहीर निषेध केला आहे. ‘आमदार झिशान सिद्दीकी यांनी या गोष्टीबद्दल माफो मागावी, अशी मागणी मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या (MIA) वतीने करत आहोत. पत्रकार स्वप्निल जाधव याच्यासोबत आम्ही आहोत,’ अशी स्पष्ट भूमिका एमएआय संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांनी घेतली आहे.

काँग्रेसचे सोयीस्कर मौन

या घटनेबाबत सर्व थरांतून निषेध व्यक्त केला जात असला तरी, लोकशाहीची गळचेपी होत असल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसने याबाबत मौन बाळगले आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मात्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, याबाबत काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांच्याकडे पत्रकाराला धमकी दिल्याबाबत विचारणा केली असता, आपण असे बोललोच नाही, असे सांगत त्यांनी कानावर हात ठेवले.


हेही वाचा : My Mahanagar च्या प्रतिनिधीला धमकी : विविध पत्रकार संघटनांकडून निषेध, काँग्रेसचे मात्र मौन


 

- Advertisment -