घरलाईफस्टाईलSoap Invention : साबणाचा शोध कोणी व कधी लावला?

Soap Invention : साबणाचा शोध कोणी व कधी लावला?

Subscribe

आपण सर्वजण लहानपणापासून साबण वापरत आलो आहोत. आज बाजारात स्वस्तापासून ते महागड्यापर्यंत अनेक प्रकारचे साबण उपलब्ध आहेत. साबन त्वचेवरील घाण साफ करण्याचे काम करतो. याशिवाय साबन बॅक्टेरिया आणि इतर जंतू देखील काढून टाकतो. पण याचा शोध कोणी लावला, याचा कधी विचार केला आहे का? लोक ते किती काळ वापरत आहेत? ते प्रथमच कुठे वापरले गेले?

इतिहासकार म्हणतात की, 5 हजार वर्षांपूर्वी बेबीलोनमध्येही लोक साबण वापरत असत. बॅबिलोनचे जुने नाव बाबिल होते, सध्या ते बगदादजवळ आहे. उत्खननादरम्यान येथे साबण सापडले. साबणाचा शोध कोणी लावला असावा, याचा पुरावा अद्याप मिळालेला नाही, पण उत्खननात सापडलेल्या साबणांवरून हे स्पष्ट होते की साबणाचा शोध त्या वेळीच लागला होता. एकेकाळी साबणावर लक्झरी टॅक्स लावला जात होता. खुद्द रवींद्रनाथ टागोर यांनी भारतातील स्वातंत्र्य चळवळीदरम्यान साबणाचा प्रचार केला होता.

- Advertisement -

सुमारे 2500 वर्षांपूर्वी ‘द एबर्स पॅपिरस’ नावाच्या वैद्यकीय दस्तऐवजात याचा उल्लेख आहे. यानुसार, प्राचीन इजिप्तमध्ये धुण्यासाठी साबणाचा वापर केला जात असे. याशिवाय त्वचाविकारांवरही साबणाचा वापर केला जात असे. वनस्पती आणि प्राण्यांपासून काढण्यात आलेल्या तेलापासून हा साबण तयार केला जायचा.

साबणावर लक्झरी टॅक्स
19व्या शतकात साबण लक्झरी वस्तूंमध्ये गणले जायचे. त्यावेळी जगातील अनेक देशांमध्ये साबणावर प्रचंड कर लादण्यात आला होता. महायुद्धाच्या काळात जेव्हा प्राणी आणि वनस्पतींच्या चरबीपासून बनवलेल्या साबणांचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा कंपन्यांनी कच्चा माल म्हणून सिंथेटिक पदार्थांचा वापर सुरू केला.

- Advertisement -

माउंट सापांवरुन पडलं साबनाचं नाव
साबणाशी संबंधित इतिहासाबाबत असे देखील सांगितले जाते की सुमारे 4 वर्षांपूर्वी काही रोमन स्त्रिया टायबर नदीच्या काठावर बसून कपडे धुत होत्या. त्यादरम्यान नदीच्या वरच्या भागातून बळी दिलेल्या काही प्राण्यांची चरबी नदीच्या काठावरील मातीत घट्ट झाली. ही माती कपड्यांवर लावताच त्यांच्यात एक वेगळीच चमक दिसली. त्यामुळे या मातीला ‘साबण’ असे नाव पडले. इथेच साबण हे नाव लोकांच्या ओठावर आले.

साबण व्यापाराच्या रूपात विकसित
यानंतर प्राचीन चीन, इस्राइल, अरब, रोम या ठिकाणाही साबणाचा वापर होऊ लागला. पंधराव्या शतकात साबण व्यापाराच्या रूपात विकसित झाला. 1525 साली फ्रान्सच्या मरसेलिसमध्ये साबणाचे 2 कारखाने होते. अठराव्या शतकानंतर तर साबण जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला. विसाव्या शतकात जगातल्या मोठ्या कंपन्यांनी आपल्या साबणाच्या व्यापाराचा विस्तारही केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -