Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthOral Health: ओरल हेल्थची काळजी न घेतल्याने होतील 'हे' आजार

Oral Health: ओरल हेल्थची काळजी न घेतल्याने होतील ‘हे’ आजार

Subscribe

ओरल हेल्थचे आजार ही व्यक्तीचे आरोग्य, नाते आणि सामाजिक जीवनावर परिणाम करू शकते. हे माहिती असून सुद्धा काही लोक ओरल हेल्थ आणि डेंटल हेल्थला महत्त्व देत नाहीत. तुमच्या दररोजच्या जीवनशैलीत फास्ट फूड आणि कोल्ड ड्रिंग यांच्या सेवनामुळे तुम्हाला ओरल हेल्थच्या आजाराचा होण्याची दाट शक्यता असते. जवळपास 60 गाठण्यापर्यंत 99 टक्के लोकांना दाताच्या आजाराचा सामना करत आहेत.

‘या’ आहे दाताचे आजार

दातावर डाग

कोल्ड ड्रिंक्स, चहा, कॉफी, फास्ट फूड आणि ब्रश न बदल्याने दातांची चमक निघून जाते. यामुळे दातांवर डाग पडतात. यानंतर तुमचे दात हळूहळू पिवळे होऊ लागतात. डाग असलेल्या दाता तुम्ही खूप वाईट दिसू लागतात आणि यापासून वाचण्यासाठी तुम्ही दिवसातून दोन वेळा ब्रश करणे गरजेचे आहे. तुमच्या दाताचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल, तर तुम्ही 2 वर्षातून एकदा डॉक्टरकडे जावे.

- Advertisement -

 

- Advertisement -

दात दुखणे

दात सडणे, घाण, पू आणि संसर्ग यामुळे तुमचे दात खराब होऊ लागतात. यामुळे दात सतत दुखू लागतो आणि तुमचे दात सेंसिटिव होऊ लागतात. जेवण केल्यानंतर दातामध्ये अन्नाचे काही कण अडकून राहतात. यावेळी तुम्ही झोपण्यापूर्वी ब्रश केला नाही किंवा तुम्ही योग्य पद्धतीने ब्रश केला नाही, तरी देखील तुम्हाच्या दाता प्लेक आणि टार्टरसारख्या आजार उद्भवू शकतात. यामुळे तुमचे दात सडण्याची शक्यता जास्त असते.

तोंडाचा कॅन्सर

तोंडाचा कॅन्सरमध्ये तुमच्या तोंडाच्या आजूबाजूचा कोणताही भागाचा समावेश असू शकतो. यात ओठ, जीभ, टॉन्सिल्स आणि ऑरोफरीनक्सचा समावेश असू शकतो. यावेळी फोड आणि गाठी सुद्धा येऊ शकतात. या समस्या पुढे जाऊन कॅन्सरचे रुप धारण करू शकतात. तंबाखू खाणे आणि सिगरेट पिणे यामुळे जास्त प्रमाणात तोंडाचा कॅन्सर होतो.

पीरियडॉन्टल रोग

पीरियडॉन्टल रोगमध्ये हिरड्याचे संक्रमण होतो. तुम्ही जेवण केल्यानंतर ब्रश केला नाही, तर बॅक्टीरियामुळे तुमच्या हिरड्याच्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. ज्यामुळे तुमच्या हिरड्यांना सूज येणे आणि रक्त येणे या समस्या जाणवतात. यावेळी तुम्ही तत्काळ दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन इलाज करावा.


हेही वाचा – Oral Health Of Kids : लहान मुलांच्या ओरल हेल्थसाठी वापरा ‘या’ टिप्स

- Advertisment -

Manini