Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthडेंटल चेकअपची गरज आहे का? कसं ओळखाल

डेंटल चेकअपची गरज आहे का? कसं ओळखाल

Subscribe

शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच वेळोवेळी दातांची तपासणी करणे गरजेचे असते. दिवसभर चहा, कॉफी प्यायल्याने, अन्नपदार्थांच्या सेवनाने आणि वारंवार धूम्रपान केल्याने दातांच्या आरोग्याला हानी पोहोचते. त्यामुळे दातांची वेळोवेळी तपासणी करून घेणे गरजेचे असते. दातांची तपासणी न केल्यास दातांमध्ये पोकळी, वेदना आणि रक्तस्राव या समस्यांना सामोरे जावे लागते.

तज्ज्ञांच्या मते, दर ३ ते ४ महिन्यांनी दातांची तपासणी करणे खूप गरजेचे असते. याने काही समस्या असल्यास त्यावर वेळेत उपचार करता येतात. दातांचा वाढता रोग अंडी हिरड्यांचे आरोग्य निरोगी राखता येते. याच्या मदतीने दातांमध्ये वाढणारी पोकळी आणि भेगाही ओळखता येतात. त्यामुळे वेळोवेळी डेंटल चेकअप करणे गरजचे असते.

- Advertisement -

डेंटल चेकअपची गरज आहे का? कसं ओळखाल

- Advertisement -

दातदुखी – बॅक्टरीयाच्या संसर्गामुळे आणि हिरड्यांना सूज आल्याने दातदुखी सुरु होते. कालांतराने आजुबाजुचेही दात दुखू लागतात. त्यामुळे वेळोवेळी डेंटल चेकअप करणे गरजेचे असते.

हिरड्यांतून रक्तस्त्राव होणे – अनेक जणांना ब्रश करताना हिरड्यातून रक्त येण्याची समस्या जाणवते. यासह दरवेळेला तोंड स्वच्छ धुतल्यानंतर किंवा काही खाल्यानंतर तुमच्या दातांमधून रक्त येत असेल तर डॉक्टरकडे अवश्य जा.

दात पडणे – अचानक दात पडणे, दुखापत झाल्याने किंवा एखाद्या वस्तूशी आदळल्याने दात पडणे ही गंभीर समस्या असू शकते. अशावेळी दातांची योग्यरीत्या काळजी घेणे गरजेचे आहे.

दात खराब होणे – अनेकांचे दात पिवळे पडतात किंवा दातांवर डाग पडतात. अशा परिस्थितीत दातांचे आरोग्य आणखीनच बिघडू नये यासाठी डेंटल चेकअप करून घ्या.

 

 


हेही वाचा ; रूट कॅनलच्या दुखण्यापासून अशी मिळवा सुटका

- Advertisment -

Manini