घरमहाराष्ट्रRamdas Athawale : वंचितचे स्वतंत्र लढण्याचा लाभ महायुतीला, आठवलेंची प्रतिक्रिया

Ramdas Athawale : वंचितचे स्वतंत्र लढण्याचा लाभ महायुतीला, आठवलेंची प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीसोबत फारकत घेत त्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढली तर त्याचा लाभ महायुतीला होईल, यात शंका नसल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – MVA: मविआत नाराजी; ठाकरे गटाची यादी जाहीर होताच काँग्रेस नेत्यांची ‘दिल्लीवारी’

- Advertisement -

प्रकाश आंबेडकर यांनी ‘एकला चलो रे’ची घोषणा दिली असली तरी, सर्व दलित मतदार वंचितकडे जाणार नाहीत. त्यामुळे माझ्याबरोबर असणारा रिपब्लिकन मतदार निर्णायक ठरत आला आहे. कोणती लाट असो की नसो; आकाशपाताळ एक झाले तरी रामदास आठवले यांच्यासोबत असणारा रिपब्लिकन मतदार कधीही मला सोडून जात नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

मागील 2014च्या लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी 83 हजार मते मिळवली होती. असे सर्व जिल्ह्यांत रिपाइंचे मातब्बर पँथर माझ्यासोबत आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आज दलितांसोबत सर्व जातधर्माच्या मतदारांचा ओढा रिपाइंकडे आहे, असे सांगून आठवले म्हणाले की, माझ्या पाठीशी देशभरातील आंबेडकरी जनतेसह मुस्लीम, बहुजनांच्या एकजुटीची भीमशक्ती उभी आहे. म्हणूनच रिपाइंला डावलण्याचे पाप करू नका, जनता तुम्हाला माफ करणार नाही. तोडणे सोपे असते जोडणे अवघड असते, हा भगवान बुद्धांनी दिलेला संदेश आम्ही मानतो.

- Advertisement -

हेही वाचा – LokSabha Elections 2024 : शिंदे, पवार, आठवले भाजपाचे स्टार प्रचारक; महाराष्ट्रातील यादी जाहीर

मनसेला सोबत घेण्याला आक्षेप

मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे इफेक्ट मोठा आहे आणि त्याचा विचार करून लोकसभा निवडणुकीत भाजपाला तोटा होणार आहे, असा कोणी अंदाज भाजपाला दिला असेल तर त्याची चिंता करण्याची गरज नाही, असे रामदास आठवले म्हणाले. मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या मागासांना ईडब्ल्यूएसचे 10 टक्के आरक्षण दिले, त्याचा लाभ मराठा समाजाने घेतला आहे. राज्य सरकारने देखील मराठा आरक्षण कायदा केला आहे. त्यामुळे मराठा समाज योग्य तो निर्णय घेईल. पण मनसेला सोबत घेऊन मराठा तितुका मेळवावाचा प्रयोग यशस्वी ठरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मनसेमुळे परप्रांतियांची महायुतीला मिळणारी मते थेट काँग्रेसकडे जातील. त्यामुळे तेल गेले आणि तूपही गेले, हाती आले धुपाटणे, अशी स्थिती होईल. त्यामुळे आपल्या मूळ महायुतीच्या मित्रांवर विश्वास ठेऊन लोकसभेच्या युद्धात उतरा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : आंबेडकरांच्या एकला चलो रे भूमिकेवर संजय राऊत म्हणतात, …संविधानाचे दुर्दैव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -