Sunday, April 28, 2024
घरमानिनीHealthदीर्घायुष्य जगणाऱ्या व्यक्ती फॉलो करतात 'या' सवयी

दीर्घायुष्य जगणाऱ्या व्यक्ती फॉलो करतात ‘या’ सवयी

Subscribe

प्रत्येकाच्या मनात जगातील यशस्वी आणि श्रीमंत व्यक्तींचे आयुष्य नक्की कसे असे हे जाणून घेण्याची फार उत्सुकता असते. मात्र तुम्ही कधी ब्लू झोन एरियाबद्दल ऐकले आहे का? खरंतर येथे राहणारी लोक वयाची शंभरी गाठतातच. पण त्याचसोबत हेल्दी आयुष्य ही जगतात.

वास्तविकरित्या काही लोकांना माहिती नसते की, ब्लू झोन एरिया नक्की काय आहे. ग्रीस मधील इकारिया, कॅलिफोर्नियातील लोमा लिंडा, इटलीतील सार्डिनिया, जापान मधील ओकिनावा आणि कोस्टा रिका मधील निकोया ब्लू झोन एरिया म्हणून ओळखले जातातत. येथे राहणाऱ्या लोकांचे वय 100 वर्ष असते.

- Advertisement -

अमेरिकन लेखक आणि संशोधक डॅन बटनर यांनी दीर्घायुष्य जगणाऱ्या क्षेत्रातील व्यक्तींवर अधिक शोध सुरु केला होता. त्यांच्या उद्देश असा होता की, जगातील लोकांना सांगायचे होते ते आयुष्याची ऐवढी वर्ष कसे जगतात. दीर्घायुष्य जगणाऱ्या व्यक्तीं आनंदीत राहण्यासाठई कमी प्रोटीन असणारे डाएट. हेल्पिंग नेचर, सोशल कनेक्शन याची मदत घेतातच. पण या व्यतिरिक्त सुद्धा अशा काही गोष्टी करतात ज्या तुम्हाला करायच्या असतात पण काही कारणास्तव त्या केल्या जात नाहीत.

19 habits of adorable elderly couples

- Advertisement -

खरंतर ते असे म्हणतात की, तुमच्यातील इकिगाई शोधा. इकिगाई हा जापानी शब्द आह.त्यानुसार जापानी लोक आपले आयुष्य कसे उत्तम जगता येईल आणि सार्थकी लागेल यासाठी प्रयत्न करतात. त्याचसोबत तुम्हाला असा विचार करायचा आहे की, सकाळी उठल्यानंतर तुम्हा अशी कोणती गोष्ट आहे जी प्रेरित करते. तिच शोधायची आहे आणि तिला आत्मसात करायचे आहे.

डॅनर बटनर यांनी आपल्या संशोधनात कॅलिफोर्नियातील लोमा लिंडा यांच्या एका 105 वर्षीय महिलेचा उल्लेख केला. तेव्हा ती आपल्या दिवसाची सुरुवात ओट्स सोबत करते. त्यात आक्रोड, हाय फायबर, खजूर आणि थोडस सोया मिल्क मिक्स करते. त्याचसोबत हेल्दी ज्यूसचे सेवन ही करता. खरंतर हेल्दी ब्रेकफास्ट हेल्दी आयुष्याची किल्ली आहे.

बटनर यांच्यानुसार पाच ब्लू झोन मधील एकतरी व्यक्ती सकाळी कॉफीचे सेवन करतो. येथे कॉफी म्हणजे दूध. साखर आणि फुल्ल क्रिम असणारी कॉफी तयार केली जात नाही. खरंतर प्लांट बेस्ड मिल्क, कॉफी आणि स्टीविा असे काही नैसर्गिक स्वीटनर वापरून हेल्दी कॉफी तयार केली जाते. त्याचसोबत या व्यक्ती हेल्दी आयुष्यासाठी सकाळी पौष्टिक भोजन, 20 मिनिटे व्यायाम आणि जो कोणतीही पहिला व्यक्ती भेटेल त्याची मदत करणे अशी काही कामे करतात. हार्वर्डच्या एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, जर तुम्ही तुमच्या शेजाऱ्यासोबत उत्तम व्यवहार कराल तर तो सुद्धा तुमच्यासोबत तसेच वागेल. जेणेकरुन तुम्ही आनंदित होता.


हेही वाचा- Retinol Deficiency पासून दूर राहण्यासाठी खा ‘हे’ फूड्स

- Advertisment -

Manini