घरदेश-विदेशLive Update: भारतीय संघाने कोरले आशिया चषकावर नाव

Live Update: भारतीय संघाने कोरले आशिया चषकावर नाव

Subscribe

भारतीय संघाने कोरले आशिया चषकावर नाव

10 गडी राखत केला श्रीलंकेचा पराभव

- Advertisement -

तीन षटकात भारताच्या 32 धावा

सलामीचे फलंदाजच ठोकतायेत धावा

- Advertisement -

संसदेच्या वाचनालय इमारतीत सर्वपक्षीय बैठक सुरू

उद्यापासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होणार आहे


श्रीलंकेचा डाव 50 धावांत गुंडाळला

भारतीय संघ उतरणार फलंदाजीसाठी


श्रीलंकेच्या 12 षटकात सात बाद 39 धावा

भारताचा आशिया चषकाच्या फायनलमध्ये दबदबा


श्रीलंकेचे आणखी दोन गडी बाद, 12 धावांवर पाच विकेट

लागोपाठ दोन गडी बाद झाल्याने संघ अडचणीत


श्रीलंकेची खराब सुरुवात 8 धावांत तीन गडी तंबूत

3.3 षटकात श्रीलंकेच्या आठ धावा झाल्या आहेत. तर तीन गडी बाद झाले आहेत.


Asia Cup 2023: श्रीलंकेनं नाणेफेक जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय

थोड्याच वेळात आशिया कपचा मेगा फायनल मुकाबला सुरू होणार आहे.

_________________________________________________

कुर्ला येथील 12 मजली इमारतीला आग, 60 जणांना बाहेर काढण्यात आले, 39 जणांना रुग्णालयात दाखल

मुंबईतील कुर्ला परिसरातील एका 12 मजली निवासी इमारतीला शुक्रवारी रात्री आग लागली होती. त्यानंतर त्यामध्ये राहणाऱ्या किमान 60 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 39 जणांपैकी 36 जणांना डिस्चार्ज करण्यात आलं. तर 3 जणांवर उपचार सुरू आहेत.

___________________________________________________

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अंबरनाथ-बदलापूरमध्ये मालगाडीत तांत्रिक बिघाड

सीएसटी, कर्जत, बदलापूरकडे जाणारी लोकलसेवा ठप्प

___________________________________________________

आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक; उद्यापासून विशेष अधिवेशन

________________________________________________

साताऱ्याच्या पुसेसावळी गावातील राड्याप्रकरणी आतापर्यंत 37 जणांना अटक

37 पैकी 20 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल

_________________________________________________

मराठवाड्याच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध-एकनाथ शिंदे

मुक्तीसंग्राम अमृत दिनाच्या शुभेच्छा

_______________________________________________________________

कोकणात जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत; रेल्वेसेवा 6 तास उशिराने

रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे रेल्वेसेवा विस्कळीत

_____________________________________________________________

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आज भाजपने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. भाजप मोदींचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा करणार आहे.

_____________________________________________________________________

मुंबई- गोवा महामार्गावर ट्रक आणि एसटी बसचा अपघात, एकाचा मृत्यू

मुंबई- गोवा महामार्गावर ट्रक आणि एसटी बसचा अपघात झाला आहे. एसटी बसनं ट्रकला धडक दिल्यानं हा अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर 19 जण जखमी आहेत

____________________________________________________________________

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -